आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PICS: लहानपणी असा दिसायचा नारायण साई, पाहा लग्‍नाचीही छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिने पोलिसांना गुंगारा देणारा लैंगिक शोषणातील आरोपी नारायण साई पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. नारायण साईला गुरुवारी दिल्लीहून सुरतला नेण्‍यात आले. चौकशीसाठी त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले.

अटक केल्‍यानंतर बुधवारी दुपारी त्याला दिल्लीच्या रोहिणी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर 24 तासांसाठी साईला गुजरात पोलिसांच्या कस्टडीत देण्यात आले. ज्या एसयुव्ही कारमधुन साईला पोलिसांनी पकडले त्यातून रोख 2.61 लाख रुपये, 6 मोबाइल व 130 सिमकार्ड जप्त करण्यात आले. कारमध्ये कामोत्तेजक औषध व्हियाग्रा, भांडीकुंडी व स्टोव्हही होता. चौकशीत साईऐवजी कारचालकच उत्तरे देत होता.

बुधवारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातील नारायण साईची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि रोहिणी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी कोर्टा बाहेर मोठ्या संख्येने साईचे समर्थक हजर होते. नारायण साईचे स्वागत करण्यासाठी ते आले होते. त्यांच्या हातात फुलांचे हार होते. साईच्या समर्थकांनी त्याच्या मार्गवर पुष्पवृष्टी केली होता. त्याच्या समर्थकांचा आरोप आहे, की साईवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत. हे त्याच्या विरुद्धचे मोठे षडयंत्र आहे.

नारायण साईच्‍या अय्याशीचे अनेक किस्‍से आणि त्‍याची कृष्‍णकृत्‍ये या दोन महिन्‍यांच्‍या कालावधीत जगासमोर आले आहेत. याच नारायण साईची काही खास छायाचित्रे आम्‍ही दाखवणार आहोत.

नारायण साईची छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...