आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशी आहे मोदी-ओबामांची CHEMISTRY, दोघांमध्ये बरेच आहे साम्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत एखाद्या जुन्या मित्राप्रमाणे एकमेकांना भेटले. मोदींच्या आमंत्रणाचे मान ठेवून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला पत्नीसमवेत प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्यास बराक ओबामा पोहोचले. त्यावेळी ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळीच केमेस्ट्री पाहायला मिळाली. 

बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथील संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी ओबामांना अनेकवेळा केवळ \'बराक\' असे संबोधित केले. तर दुसरीकडे बराक ओबामांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ मोदी असे संबोधित केले. याप्रकारच्या बोलण्यातून असेच दिसून येत होते की, खुपच कमी वेळेत बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आहेत आणि हे भारतासाठी शुभ संकेत मानले जात आहे. जर मोदी आणि ओबामांची मैत्री अशाच प्रकारे वाढत राहिली तर हे नातेसंबंध दोन्ही देशांसाठी खुपच फायद्याचे ठरतील. 

मोदी आणि ओबामा यांची एकीकडे मैत्री वाढत असताना अशा प्रसंगी आम्ही मोदी आणि ओबामा यांच्या हजारो फोटोंमधून रेअर असे फोटो निवडले आहेत. ज्यामध्ये ते दोघे वेगवेगळ्या देशांचे नेते असूनसुध्दा खुपच एकसारखे वाटत आहेत. चला तर मग पाहूयात मोदी आणि ओबामांचे हे आकर्षक फोटोज.... 
 
पुढील स्लाईडवर पाहा, मोदी-ओबामा यांच्यातील साम्य दर्शवणारे PHOTOs