आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Video Of Mahatma Gandhi Assassin Nathuram Godse

समोर आला गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेविरुद्ध चाललेल्या खटल्याचा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लालकिल्ल्यात गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेविरुद्ध खटल्याची सुनावणीचे छायाचित्र... यात (उजव्या बाजूने) नथुराम गोडसे, नारायण दत्तात्रय आपटे आणि विष्णु करकरे दिसत आहेत. )

नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेविरुद्ध लालकिल्ल्यात खटला चालला होता. या खटल्याच्या सुनावणीचा एक दुर्मिळ व्हिडिओ समोर आला आहे. 'हिस्टोरिकल क्लिप्स सहेज'ने इंग्लंडमधील 'ब्रिटिश पाथे' या एजन्सीच्या हवाल्याने प्रसिद्ध केला आहे. गोडसेविरुद्ध चाललेल्या खटल्याचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच प्रसिद्ध झाल्याचा दावा ब्रिटिश पाथे यांनी केला आहे.

तीन मिनिट 32 सेकंदांच्या या व्हिडिओला आवाज नाही. मात्र, यात गोडसे आणि अन्य दोषींना कठड्यात उभे करण्‍यात आल्याचे दिसत आहे. मुख्य दोषी नथुराम गोडसे, नारायण दत्तात्रय आपटे आणि विष्णु रामकृष्ण करकरे कठड्यात पहिल्या रांगेत असून त्यांच्या मागे पाच दोषी उभे आहेत. त्यात नथूरामचा भाऊ गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा आणि शंकर किष्ठया दिसत आहेत.
दरम्यान, महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये झाली होती. मारेकरी नथुराम गोडसेसह अन्य आरोपींविरोधातील खटल्याची सुनावणी ऐतिहासिक लालकिल्ल्यात झाली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नथुराम गोडसेविरुद्ध खटल्याच्या सुनावणीचा VIDEO