आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँगकॉकमध्‍ये करणार होतो ललित मोदींचा \'गेम\'; छोटा शकीलने केला गौप्‍यस्‍फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांचा बँगकॉकमध्‍ये 'गेम' वाजवणार होतो. पण, ज्‍या ठिकाणी हत्‍या करण्‍याचे ठरवले तिथे पोहोचण्‍यास उशीर झाल्‍याने प्‍लॅन फसला, असा गौप्‍यस्‍फोट अंडरव‌र्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा चेला छोटा शकील याने आज (रविवार) एका वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतील केला. शकील म्‍हणाला, ''क्रिेकेटसोबत माझे काहीही घेणे देणे नाही. अन्‍य एका प्रकरणात ललित यांचा गेम वाजवायचा होता. क्रिकेटच्‍या कारणाने त्‍यांची हत्‍या करायचीच असती तर कधीचीच केली असती. आम्‍हाला ललित यांच्‍याकडून एक हजार कोटी रुपये यायचे होते. त्‍यासाठी त्‍याच्‍या खुनाचा प्‍लॅन आम्‍ही आखला होता. पण, आता त्‍यांनी आमचे पैसे आम्‍हाला दिले आहेत. त्‍यामुळे त्‍यांना आमच्‍याकडून कुठलाही धोका राहिला नाही'' , हेही शकील याने सांगितले. मात्र, एवढी रक्‍कम ललित यांच्‍याकडून कशासाठी घ्‍यायची होती हे सांगण्‍याचे शकील याने टाळले.


डी कंपनीच्‍या नावाच्‍या मदतीनेच ललित विदेशात

ललित मोदी यांनी लंडन पोलिसांना सुरक्षा मागितली आहे. पण, त्‍या ठिकाणी ते डी कंपनीच्‍या नावाचा वापर करूनच राहत असल्‍याचा दावाही शकील याने केला. ज्‍याला चांगले काम करायचे आहे तोही आमचे नाव घेतो आणि ज्‍याला वाईट काम करायचे आहे तोही आमचे नाव घेतो, असेही शकील म्‍हणाला.

ललित मोदींना टीव टीव भोवली; राष्‍ट्रपती भवनाकडून पोलिसांत तक्रार

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी हे मागील काही दिवसांपासून रोज काही ना काही ट्विट करत आहेत. पण, हीच टीव टीव त्‍यांच्‍या अंगलट आली असून, त्‍यांनी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सचिव ओमिता पॉल यांच्याविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी राष्‍ट्रपती भवनाकडून मोदींविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्‍यामुळे ललित हे पुन्‍हा चर्चेत आलेत.

तक्रार राष्ट्रपती भवनाकडून दिल्ली पोलिसांकरण्‍यात आलेल्‍या तक्रारीत म्‍हटले, 23 जूनला ललित यांनी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सचिव ओमिता पॉल यांच्‍या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. दिल्‍ली पोलिस आयुक्‍त बी.एस. बस्‍सी यांनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्‍यात ललित हे दोषी आढळले तर त्‍यांच्‍यावर कारवाई गुन्‍हा दाखल केला जाणार आहे. दरम्‍यान, ाहिती तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी) कलम ६६ (अ) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या प्रकऱणी मोदी यांच्यावर कोणत्या तरतुदीन्वये कारवाई केली जाईल, याकडे लक्ष लागले आहे.