आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashtrapati Bhavan Lodged Complaint Against Lalit Modi

ललित मोदीविरुद्ध राष्ट्रपती भवनाची पोलिसांत तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनाने ललित मोदीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मोदीने २३ जूनला केलेल्या ट्विटची प्रतही तक्रारीसोबत जोडण्यात आली. या ट्विटमध्ये मोदीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव अमिता पॉल यांच्या नावाचा अयोग्य पद्धतीने उल्लेख केला होता. राष्ट्रपती भवनाने ही तक्रार दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सींकडे पाठवली आहे. त्यांनी ती आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवली आहे.

हवाला संबंधांचा आरोप
मोदीने ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘हवालाचा सर्वात मोठा ऑपरेटर विवक नागपाल असून अमिता पॉल यांचा बॅगमॅन अशी त्याची ओळख आहे. त्याच्याबाबत खूप माहिती आहे. कोणाला त्याची पर्वा आहे का?’ काही दिवसांपासून ललित मोदीने अनेक ज्येष्ठ नेत्यांवर आरोप केले आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ललित मोदीला मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप असून पक्ष या दोघींच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहे.