आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटींमध्ये तयार झाल्या 340 रुम, आतून असे दिसते प्रेसिडेंट हाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती भवनातील बेडरुम. आजही या बेडरुम व्हिंटेज लूकमध्ये आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
राष्ट्रपती भवनातील बेडरुम. आजही या बेडरुम व्हिंटेज लूकमध्ये आहे. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - 67 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलिब्रेशनसाठी राष्ट्रपती भवनाची तयारी अंतिम टप्यात आहे. विद्यूत रोषणाईने सजलेल्या नॉर्थ आणि साउथ ब्लॉकचे फोटोज प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. राष्ट्रपती भवन बाहेरुन जेवढे भव्य दिसते, तेवढाच सुंदर त्याचा अंतर्गत नजारा आहे. divyamarathi.com राष्ट्रपती भवनाचा आतिल भाग या पॅकेजमधून तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

केव्हा तयार झाले राष्ट्रपती भवन
- राष्ट्रपती भवन कधीकाळी व्हॉइसरॉय हाऊस नावाने ओळखले जात होते.
- जवळपास दोन लाख स्केअर फूट एरियात असलेले हे भवन स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश व्हॉइसरॉयचे सरकारी निवासस्थान होते.
- याचे बांधकाम 1912 मध्ये सुरु झाले आणि 1929 मध्ये पूर्ण झाले होते.
- ही इमारत चार मजली असून त्यात 340 रुम आहेत.
- या इमारतीचे मुख्य इंजिनिअर एडव्हीन लँडसोर लुटियन्स होते.
- अशी माहिती आहे, की त्या काळात राष्ट्रपती भवनाच्या बांधकामासाठी दीड कोटी रुपये खर्च आला होता आणि 17 वर्षे लागली होती.
- इमारतीसाठी जवळपास 70 कोटी विटा आणि 30 लाख क्यूबिक फूट दगड वापरण्यात आला.

कसे आहे इंटेरियर
- राष्ट्रपती भवनाचे बांधकाम बौद्ध स्थापत्य शैलीचे आहे.
- येथील स्तंभांवर कोरण्यात आलेली घंटा बौद्ध आणि जैन शैलीतील आहे.
- स्तंभांची प्रेरणा कर्नाटकातील मूडाबिर्दी येथील जैन मंदिरावरुन घेतल्याचे सांगितले जाते.
1911 मध्ये निर्णय झाला की भारताची तत्कालिन राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलवली जाईल. त्यानंतर ब्रिटीश व्हॉइसरॉयला राहाण्यासाठी शानदार इमारत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती भवनात राहात होते. स्वंतत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद 26 जानेवारी 1950 मध्ये या भवनात आले आणि तेव्हापासून देशाच्या राष्ट्रपतींचे हे शासकीय निवासस्थान झाले. त्याला राष्ट्रपती भवन संबोधले जाऊ लागले.

मुगल गार्डन
राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डन प्रसिद्ध आहे. मुगल गार्डनसह राष्ट्रपती भवनातील इतर बागांच्या देखरेखीसाठी सव्वा दोनशेहून अधिक माळी आहेत. मुगल गार्डनमध्ये 110 हून अधिक जातींचे औषधी झाडे आणि 200 गुलाबांच्या जाती आहेत. मुगल गार्डनमधील विविध रंगांचे गुलाब पाहाणे हा सुंदर अनुभव असतो.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राष्ट्रपती भवनातील INSIDE PHOTOS...