आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashtriya Swayamsevak Sangh News In Marathi, Election,Organiser

संघाच्या मुखातून मंदिर गायब, रा.स्व.संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर-पांचजन्यचे सर्वेक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील निवडणुकीचे वातावरण जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये देशातील आश्चर्यचकित करणारा मूड समोर आला आहे. देशाला आता राममंदिर नव्हे तर विकास पाहिजे, असे सर्वेक्षणात दिसून आले. रोजगार, वीज, पाणी, रस्ते, चांगली रुग्णालये आणि चांगली शासन व्यवस्था जनतेला हवी आहे. ‘लोकसारथी’ या स्वतंत्र संस्थेमार्फत ऑर्गनायझरने हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये 380 लोकसभा मतदारसंघांतील 1.14 लाख मतदारांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल व निष्कर्ष ऑर्गनायझर आणि पांचजन्यमध्ये प्रकाशित झाले आहेत. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना देशात प्रथम पसंती मिळाली आहे. परंतु दक्षिणेत मात्र राहुल गांधी आघाडीवर आहेत.


हे आमचे सर्वेक्षण नाही
सर्वेक्षण संघाने नव्हे तर स्वयंसेवकांचे मासिक
ऑर्गनायझरने केले आहे. संघ कधीही, कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करीत नाही.- राम माधव, प्रवक्ते, संघ


चला, सुबुद्धी सुचली
उशिरा का होईना, संघाला सुबुद्धी सुचली आहे. देशाला
आज केवळ विकासाची गरज आहे.- राशिद अल्वी, काँग्रेस

सर्वेक्षणाचे निष्‍कर्ष :
* मंदिर नको, देशाला विकास हवा
* दक्षिणेत राहुल, उर्वरित ठिकाणी मोदी आघाडीवर

पीएम: पसंती कुणाला ?
उत्तर भारत : 162 जागा
मोदी: 48. 60 % राहुल : 27 %
पूर्व भारत : 88 जागा
मध्‍य भारत : 83 जागा
मोदी: 45. 40 टक्के राहुल: 29 केजरीवाल: 14.20 %
पश्चिम महाराष्‍ट्र : 78 जागा
मोदी : 57 मोदी राहुल: 24. 40 , शरद पवार : 10.20 टक्के
दक्षिण भारत : 132 जागा
मोदी: 33. 30 टक्के, राहुल: 24.40 जयललिता : 15. 80 टक्के