आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयादशमी : दिल्लीच्या सुभाष मैदानावर राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत रावण दहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो ओळ - रावण दहनाचा फोटो
नवी दिल्ली - दिल्लीच्या सुभाष मैदानावर विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रावणाचे दहन करण्यात आले.
या वेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होते. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मैदानावर उपस्थित होते. त्यावेळी सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना दिसून आले.
रावण दहनाच्या कार्यक्रमापूर्वी उपस्थित पाहुण्यांनी राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची पुजा करून आरती केली. मान्यवरांच्या स्वागतानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अनुक्रमे कुंभकर्ण, मेघनाथ आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सुभाष मैदानावर आयोजित करण्यात येणा-या या रावणदहन कार्यक्रमाला सुमारे 90 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. याठिकाणी दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते रावण दहन केले जाते. या कार्यक्रमानंतरच दिल्लीत विविध ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा रावणदहन कार्यक्रमाचे फोटो...