आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ravindra Gaikwad, All Indian Cabin Crew Wants An Unconditional Apology From Shiv Sena MP

माफीवर पायलट ठाम, विमान उड्डाणास नकार; गायकवाडांवरील बंदी एअर इंडियाकडून मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली विमान प्रवासबंदी एअर इंडियाने शुक्रवारी तत्काळ मागे घेतली. खा. गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला सँडलने मारहाण केल्यानंतर देशभरातील विमानसेवा कंपन्यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत त्यांच्यावर विमान प्रवासबंदी घातली होती. तब्बल दोन आठवड्यांनंतर ही बंदी उठवण्यात आली आहे.  असे असले तरीही खा. गायकवाड जोपर्यंत बिनशर्त माफी मागत नाहीत, तोवर ते प्रवास करत असलेल्या विमानाचे उड्डाण करणार नाही, असा इशारा पायलटांच्या संघटनेने दिला आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून खा. गायकवाडांवर घातलेली बंदी उठवण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर ही बंदी उठवण्यात आल्याचे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. खा. गायकवाड यांनी गुरुवारी नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून झाल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती आणि भविष्यात असे होणार नाही, याची हमीही दिली होती. खा. गायकवाड यांनी २३  मार्च रोजी एअर इंडियाच्या एका ६० वर्षीय अधिकाऱ्याला सँडलने मारहाण केली होती. खासगी वृत्तवाहिन्यांशी बोलताना खा. गायकवाड यांनी तशी कबुलीही दिली होती. त्यानंतर २४ मार्च रोजी एअर इंडिया व देशातील अन्य सहा विमान सेवा कंपन्यांनी त्यांवर प्रवास बंदी घातली होती. फेडरेशन ऑफ इंडियन एअर लाइन्सनेही खा. गायकवाडांवर बंदी घातलेली होती. फेडरेशनने आतापर्यंत बंदी उठवल्याची घोषणा केलेली नाही. मात्र एअर इंडियाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशनही बंदी उठवण्याची शक्यता आहे. या बंदीवरून शिवसेनेने गुरुवारी लोकसभेत चांगलाच राडाही केला होता. त्यानंतर वेगाने घटनाक्रम घडला आणि शुक्रवारी अखेर बंदी मागे घेण्यात आली.  
 
पहाटे पाच वाजता तिकीट बुक करण्याचा प्रयत्न फसला :  एअर इंडियाकडून बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खा. गायकवाड यांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता या विमानसेवा कंपनीच्या पोर्टलद्वारे विमान प्रवासाचे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इंडियन एअर लाइन्सने त्यांचे बुकिंग नाकारले. १७ एप्रिल रोजी दिल्ली- मुंबई आणि २४ 
एप्रिल रोजी मुंबई-दिल्ली विमान प्रवासासाठी तिकीट बुक करण्याचा गायकवाडांचा प्रयत्न होता.
 
पुढील स्लाईडवर वाचा, केबिन क्रूही आग्रही...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...