आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Kishor Sinha Is The Richest Rajyasabha Candidate

भाजपचे रविंद्र सिन्हा सर्वात श्रीमंत राज्यसभा उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे रविंद्र किशोर सिन्हा हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. सिन्हा व त्यांच्या पत्नी या दोघांची मिळून 800 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्हा यांच्या नावावर 564 कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 230 कोटी संपत्तीची नोंद आहे.
सुरक्षा आणि गुप्तचर सेवा (सिस) या सुरक्षा एजन्सीचे मालक असलेल्या सिन्हा यांनी जदयू तर्फे राज्यसभेची निवडणूक लढवलेल्या महेंद्र प्रसाद यांना संपत्तीच्या शर्यतीत मागे टाकले आहे. प्रसाद यांच्याजवळ 683 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. तर स्वतंत्र उमेदवारी दाखल करत राज्यसभेपर्यंत पोहोचलेले किंगफिशरचे मालक विजय माल्या (615 कोटी) तर समाजवादी पक्षातर्फे राज्यसभेत गेलेल्या अभिनेत्री जया बच्चन (493 कोटी) यांच्याजवळसुध्दा सिन्हा यांच्या एवढी संपत्ती नाही.
सिन्हा व त्यांच्या पत्नीच्या संपत्तीचा आढावा.
संपत्ती सिन्हा त्यांची पत्नी
शेअर आणि बॉन्ड 525.20 कोटी 221.80 कोटी
रोख 11.8 कोटी 3.35 लक्ष
बॅंकेमधील संपत्ती 29.02 कोटी 4.9 कोटी
राष्ट्रीय बचतपत्र 3.5 लाख 5.03 लाख
वाहन 7.04 लाख 9.03 लाख
दोघांची एकूण संपत्ती 794 कोटी
रविंद्र किशोर सिन्हा व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एकूण संपत्तीची आकडेवारी त्यांनी राज्यसभेत उमेदवारीसाठी दाखल केलेल्या अॅफेडेव्हिटवरून घेण्यात आली आहे.
कोण आहेत रविंद्र किशोर
62 वर्षीय रविंद्र किशोर सिन्हा यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंध होते. सिन्हा यांनी 1971 मध्ये पाटणा येथून एका दैनिकात प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यावेळी त्यांना बांगलादेशाच्या लढाईचे वृत्तांकन करण्याची संधी मिळाली. या लढाईचे वृत्तांकन करताना सिन्हा यांची भेट काही सैन्य जवानांसोबत झाली. या जवानांनी त्यांना सुरक्षा आणि गुप्तचर सेवा (सिस) बनवण्याची कल्पना दिली. त्यानंतर सिन्हा यांनी 1971 मध्ये पत्रकारीता सोडून दिली. सिन्हा यांनी केवळ 250 रुपयांमध्ये आपल्या उद्योगाला सुरूवात केली आणि पाहता पाहता त्यांच्या हा उद्योग कोटींच्या घरात पोहोचला. या सुरक्षा एजन्सीबाबत सांगायचेच झाल्यास 'सिस'ने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन सुरक्षा एजंसी 'क्यूब'ला विकत घेतले.
रविंद्र आणि सीपी यांचा विजय नक्की
भाजपने रविंद्र सिन्हा आणि सीपी ठाकूर यांना बिहारवरून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मतांचे गणीत पाहता या दोघांचाही विजय नक्की आहे. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत बीजेपीचे 71 उमेदवार असून त्यांनी जिंकण्यासाठी केवळ 82 मतांची गरज आहे. ही परिस्थितीत पाहता सिन्हा आणि ठाकूर यांचे राज्यसभेत जाणे निश्चित आहे. राज्यसभेसाठी मतदान येत्या 7 फेब्रूवारीला होणार आहे.