आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RAW Officer Suicide News In Marathi, Delhi, Divya Marathi

\'रॉ\'च्या अधिकार्‍याची संशयास्पत आत्महत्या; पत्नी, मुलेही आढळले रक्ताच्या थारोळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग (रॉ) या भारतीय परराष्ट्र गुप्तचर संस्थेच्या एका अधिकार्‍याने पत्नी, दोन मुले यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवारी) उघडकीस आली आहे. अनन्य चक्रवर्ती(52) असे या अधिकार्‍याची नाव आहे. सादीक नगरातील राहत्या घरात पत्नी, मुलांची हत्या करून छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे हत्याकांड संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनन्य चक्रवर्ती यांची पत्नी जयश्री (43), मुलगा अर्णब (17) आणि मुलगी दिशा (12) यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तर चक्रवर्ती यांचा मृतदेह घराच्या छताच्या पंख्याला लटकलेला होता. अन्य सगळ्यांची हत्या धारदार शस्त्राने करण्‍यात आल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

चक्रवर्ती यांच्या घराचे दार आतून बंद होते. याचबरोबर घरात परका व्यक्ती घुसल्याचेही काहीच पुरावे आढळून आले नाही. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिस कसून चौकशी करत आहेत. कुटूंबियांची हत्या करून चकवर्तीं यांनी स्वत: आत्महत्या का केली असावी, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.