आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो रेट सात वर्षांत पोहोचला नीचांकी स्तरावर : RBI ने 10 महिन्यांनंतर व्याजदर 0.25% घटवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरबीआयने बँकांना कर्ज स्वस्त करण्याचे आवाहन केले आहे. - Divya Marathi
आरबीआयने बँकांना कर्ज स्वस्त करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई - रिझर्व्ह बँकेने १० महिन्यांनंतर बुधवारी रेपो रेट ०.२५% घटवला. आता तो ६% झाला असून वर्षांचा नीचांक आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रेपो दर ०.२५% घटवला होता. आरबीआयकडून कर्ज घेणाऱ्यांसाठीचा व्याजदर म्हणजे रेपो रेट. तो कमी झाल्याने गृह, ऑटो व्यावसायिक कर्ज स्वस्त होण्याची आशा आहे. दरम्यान, एकाही बँकेने बुधवारी रात्रीपर्यंत ग्राहकांसाठी व्याजदर कमी करण्याची घोषणा केली नाही. असे असले तरी बँकेने एक पाव टक्काही व्याजदर कमी केले तरी २० लाख रुपयांच्या गृहकर्जावर वर्षात ३८०४ रुपये बचत होईल. तसे झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी व्याजदर घटवले पाहिजेत, असे ते म्हणाले. 
 
जुन्या कर्जदारांच्या लाभासाठी बँकांनी बेस रेट घटवावा 
महागाई ऐतिहासिक १.५४% नीचांकीवर आहे. त्यामुळे आम्ही व्याजदर घटवला. जुन्या कर्जदारांना फायदा व्हावा यासाठी आता बँकांनीही बेस रेट कमी केला पाहिजे. 
-ऊर्जित पटेल, आरबीआय गव्हर्नर 

विकासदर ७.३% राहण्याची आशा 
आरबीआयने जीडीपी विकासदर ७.३% ठेवला. कृषी उत्पादन वाढीची आशा आहे. मात्र, उद्योग सेवा क्षेत्रात वाढ कमी आहे. तिथे गुंतवणुकीची मागणी कमी आहे. 

भास्कर Q & A 
एमसीएलआरच्या आढाव्यासाठी विशेष पथक, २४ सप्टेंबरपर्यंत अहवाल देणार 
Q. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवल्यानंतर सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होण्याची आशा आहे? 
A. नाही.बँक आता एमसीएलआर घटवेल. त्यात ज्या तारखेपासून व्याजदर घटेल त्या तारखेपासून कर्ज घेणाऱ्यांना फायदा होईल. आधी घेतलेल्यांना फायदा होणार नाही. 

Q.एमसीएलआरची नवी प्रणाली जुन्या बेस रेटपेक्षा वेगळी कशी आहे? 
A.लोकांनीएप्रिल २०१६मध्ये घेतलेले कर्ज बेस रेट आधारित होते. बँक जेव्हा बेस रेट घटवते तेव्हा त्याच्याशी संबंधित कर्ज स्वस्त हाेते. मात्र, एमसीएलआरमध्ये असे होणार नाही. 
 
Q.एमसीएलआर का लागू केला गेला? 
A.जुन्या व्यवस्थेत बँकांचे म्हणणे होते की, त्यांच्या पैशाची गुंतवणूक जास्त आहे. त्यामुळे रेपो रेटइतका बेस रेट कमी करू शकत नाही. त्यामुळे नवी व्यवस्था लागू. 

Q.आता रिझर्व्ह बँक काय करू शकते? 
A.एमसीएलआरच्याआढाव्यासाठी टीम स्थापन केली असून ते २४ सप्टेंबरपर्यंत अहवाल देतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेस रेटमध्ये एमसीएलआर एवढी घट व्हावी असे नाही. मात्र, बेस रेट कमी होणेही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे. 
 
 
वर्षांत १.५% रेपो रेट घटला, मात्र बँकांनी बेस रेट केवळ ०.८५% केला कमी... 
 
गृहकर्जावर अशी होणार बचत... (मुदत - 20 वर्षे)
होम लोन अमाउंट जुने रेट % मध्ये EMI रुपयांत नवीन रेट % मध्ये EMI रुपयांत वार्षिक बचत
20 लाख 8.35 17167 8.10 16836 3984
 
 
कार लोनवर होणारी बचत... (मुदत - 5 वर्षे)
कार लोन अमाउंट जुने रेट % मध्ये EMI रुपयांत नवीन रेट % मध्ये EMI रुपयांत वार्षिक बचत
5 लाख 8.75 10318 8.50 10258 720
 
बातम्या आणखी आहेत...