आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI गव्हर्नरांशी जेटलींची चर्चा; नोटा बंदीचा निर्णय अचानक नाहीच; गुरुवारपासून सुरू होते खलबते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब) - पाचशे व हजाराच्या नाेटा बंद करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली अाणि सहा दिवसांतच हा एेतिहासिक निर्णय जाहीर झाला. सर्वप्रथम अर्थमंत्री अरुण जेटलींनी सर्व शहरांतील अारबीअाय प्रमुखांशी या निर्णयाबाबत चर्चा केली हाेती.
गुरुवारी दुपारी एक वाजता जेटलींची पहिली बैठक झाली. या बैठकीत अचानक हा निर्णय घेण्यात अाला. बैठकीत काेणत्याही मॅनेजरने प्रेझेंटेशन केले नाही. उलट अर्थमंत्री जेटलींनीच त्यांच्यासमाेर या निर्णयाबाबत पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशन केले.

दुपारी २.३० ते २.५० दरम्यान जेटलींनी अारबीअायच्या सर्व व्यवस्थापकांना माेठ्या नाेटा बंद करण्याबाबत सूचना मागवल्या. लाेकांची गैरसाेय हाेईल, असे सांगत काहींनी विराेधही केला. मात्र नंतर सामूहिक निर्णय घेऊन पुढील गुरुवारपर्यंत शंभर रुपयांच्या नाेटा बँकांमध्ये वितरण करण्यास मनाई करण्यात अाली. याशिवाय अारबीअायच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना या संभाव्य निर्णयाबाबत कुठेही वाच्यता न करण्याची सक्त ताकीद देण्यात अाली. इतकेच नव्हे तर उपस्थित सर्व अधिकाऱ्यांवर यापुढे नजर ठेवण्याबाबतही सांगण्यात अाले.

निर्णयानंतर सर्व पाेलिस प्रमुखांना सुरक्षेबाबत गृह मंत्रालयातून संदेश...
मंगळवारी रात्री ९.४० वाजता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून संदेश पाठविण्यात अाला. ‘बुधवारी सकाळी अारबीअायमध्ये दरराेजपेक्षा दहापट जास्त कॅश जमा हाेऊ शकते. हा पैसा अारबीअाय पुढे पाठवेल. त्यामुळे दरराेजपेक्षा जास्त पाेलिस बंदाेबस्त ‘अारबीअाय’बाहेर तैनात करावा. तसेच ‘अारबीअाय’ची कॅश घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाेबत असणाऱ्या दरराेज असणाऱ्या बंदाेबस्तापेक्षा तिपटीने पाेलिसांची संख्या वाढविण्यात यावी.’
पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष्य...
सर्व ५६ कर रद्द करून फक्त बँक व्यवहारावर करवसुली हाेईल का?

२०१४ च्या निवडणुकीत माेदींनी कर सुधारणेचा मुद्दा मांडला हाेता. रामदेव बाबा- ‘अर्थक्रांती’ने माेठ्या नाेटा व कर बंद करून फक्त बँकिंग व्यवहारावरच टॅक्स लावण्याची सूचना केली हाेती. नाेटा बंदी करण्याची त्यांची मागणी तर पूर्ण झाली. अाता सरकारचे पुढील पाऊल बँकिंग व्यवहारावरील करांबाबत तर नसेल. बँकांमधून व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीनेच नाेटाबंदीचा निर्णयही घेतलेला अाहे.
भारताची अर्थव्यवस्था १३४ लाख काेटींची; १४.७४ लाख काेटी ‘रिअल इस्टेट’चे
-‘जीडीपी’त ११ टक्के हिस्सा असलेल्या ‘रिअल इस्टेट’क्षेत्रात काळ्या पैशाचा सर्वाधिक वापर
- एक तृतीयांश काळ्या पैशाचा वापर रिअल इस्टेटमध्ये. त्यापाठाेपाठ इतर उत्पादने, साेने व गृहाेपयाेगी वस्तू उत्पादने.
- भारतातील एक तृतीयांश जीडीपी सुमारे ८८ लाख काेटी रु. राेखीने हाेतात व्यवहार
- या निर्णयामुळे मनी लाँडरिंग, हवाला व काळ्या पैशांच्या व्यवहारावर अंकुश बसेल.
पुढील स्लाईडवर वाचा, नोटा बंदीचा निर्णय अचानक नाहीच, मागील गुरूवार पासून सुरू होती खलबते..
बातम्या आणखी आहेत...