आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई आणि गरिबांबद्दल हे काय बोलून गेले आरबीआयचे गव्‍हर्नर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गरिबांच्या जेवणाच्या सवयी बदलल्यामुळे महागाई वाढल्याचे वादग्रस्त वक्तव्य रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सुब्बाराव यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत गरिबांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. गरिब लोक अन्नधान्न्याशिवाय प्रोटिनयुक्त अंडी, मटण, दूध, भाज्या, डाळ आणि फळ जास्त खात आहेत. यामुळे महागाई वाढत असल्याचा साक्षात्कार सुब्बाराव यांना झाला आहे. त्यांनी बंगळुरूमध्ये शनिवारी हे वक्तव्य केले.

ग्रामीण भागात वार्षिक 20 टक्क्यांनी मजूरी वाढत आहे, याची आमच्याकडे आकडेवारी आहे. गरिबांचे उत्पन्न वाढत असेल तर ते जास्तीत जास्त खर्च खाण्यापिण्यावर करतात. ही मागणी आता वाढत आहे. फेडरेशन आॅफ कर्नाटक चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप नेते बलबीर पुंज यांनी सुब्बाराव यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सुब्बाराव यांनी गरिबांची थट्टा केल्याचे ते म्हणाले.