आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rbi Increases Repo Rate And Government Increases Dearness Allowance By 10%

केंद्रीय कर्मचा-यांना खुषखबर, डीए वाढला; आरबीआयचा धक्‍का, रेपो रेटमध्‍ये वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्‍ली- जनतेसाठी दोन बातम्‍या आहेत. एक चांगली आणि एक वाईट. चांगली बातमी अशी, की केंद्र सरकारने महागाई भत्ता 10 टक्‍क्‍यांनी वाढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे महागाई भत्ता आता 80 वरुन 90 टक्‍के झाला आहे. आता वाईट बातमी म्‍हणजे, जनतेवर गृहकर्जाचा बोजा वाढणार आहे. रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट 0.25 टक्‍क्‍यांनी वाढविला आहे. त्‍यामुळे गृहकर्जावरील मासिक हप्‍ता वाढणार आहे.

आरबीआयने आज तिमाही पतधोरणाचा आढावा घेतला. नवे गव्‍हर्नर रघुराम राजन यांच्‍या कारकिर्दीतील हा पहिलाच आढावा होता. आर्थिक सुधारणांच्‍या दुष्‍टीने राजन यांनी कठोर पावले उचलण्‍याचे संकेत यापूर्वीच दिले होते. आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्‍क्यांवरुन 7.5 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तसेच बँकांसाठीच्‍या कर्जाचा दर 0.75 टक्‍क्यांनी घटवून 9.5 टक्‍के केला आहे. त्‍यामुळे बँकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय बँकेने रिव्‍हर्स रेपोमध्‍येही कपात केली आहे.

केद्र सरकारी कर्मचा-यांना खुषखबर... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...