आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट अकाउंटद्वारे रि-टि्वट होत आहेत राहुल गांधीं यांचे टि्वट्स : वृत्तसंस्थेने केला दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘officeofRG’ या टि्वटर हँडलवरून होणारी रि-टि्वटची संख्या सतत वाढत आहे. ऑटोमेटेड बॉट्स राहुल यांचे टि्वटला रि-टि्वट करतेय का, असा प्रश्न एका वृत्तसंस्थेने उपस्थित केला आहे. दाव्यानुसार, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे एक टि्वट रशिया, कझाकिस्तान वा इंडोनेशियातून बॉट्स सॉफ्टवेअरद्वारे बनावट अकाउंटने रि-टि्वट होत होते. या सॉफ्टवेअरने व्यक्तीचे फॉलोअर्स कमी किंवा जास्त केले जाऊ शकतात. राहुलनी ट्रम्प यांचे एक टि्वट रि-टि्वट केले. त्यावर मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांना टोमणा मारत राहुल गांधी रशिया, इंडोनेशिया वा कझाकिस्तानातून निवडणूक लढवणार का, अशी विचारणा केली. राहुल यांचे ३ महिन्यांत १३.३७ लाख फॉलोअर्स वाढले आहेत.

राहुल यांचे टि्वट बनावट खात्यांनी २० हजारदा रि-टि्वट
१५ ऑक्टोबरला ट्रम्प यांचे अमेरिका-पाक संबंधांवरील टि्वट राहुल यांनी रि-टि्वट करत लिहिले की, मोदीजी घाई करा. ट्रम्प यांची पुन्हा एकदा गळाभेट घ्यावी लागेल असे वाटते. हे टि्वट लगेच २० हजार वेळा रि-टि्वट झाले. हे बॉट्स सॉफ्टवेअरने झाले. यात १० अकाउंटचे १० पेक्षाही कमी फॉलोअर होते.
बातम्या आणखी आहेत...