आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reactions After Resignation Of Lalkrishna Advani

मोदींबाबत तडजोड नाहीः भाजप, अडवाणी नसल्‍यास एनडीएमध्‍ये राहणे अशक्‍य- जेडीयू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- एकीकडे भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांची मनधरणी करण्‍याचे प्रयत्‍न अजुनही सुरु आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्‍या जेडीयूने भाजपच्‍या अडचणी वाढविल्‍या आहेत. अडवाणी नसल्‍यास एनडीएमध्‍ये राहणे कठीण आहे, असा निर्वाणीचा इशाराच जेडीयूने दिला आहे.

मुरली मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्‍यासह संघाचे प्रतिनिधी म्‍हणून एस. गुरुमुर्ति यांनी अडवाणींची भेट घेतली असून त्‍यांच्‍यात दिर्घकाळ चर्चा झाली. कोणत्‍याही परिस्थितीत मोदींबाबत तडजोड करण्‍यास भाजप आणि संघ तयार नाही. त्‍यामुळे हा तिढा लवकर सुटण्‍याची शक्‍यता नाही. अडवाणी भाजपचे सर्वोच्‍च नेते आहेत. परंतु, राजकारण सुरुच राहणार असून मोदींबाबत घेण्‍यात आलेला निर्णय बदलणार नाही, असे भाजपचे उपाध्‍यक्ष प्रभात झा यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकसभेच्‍या विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांनीही अडवणींची भेट घेतली. त्‍यांनी सांगितले की, अडवाणी चिडलेले नाहीत. त्‍यांचा राजीनामा फेटाळण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे कोणताही प्रश्‍नच निर्माण होत नाही.

एकीकडे लालकृष्‍ण अडवाणी यांची भाजपचे नेते मनधरणी करीत आहेत. संघाने तर वेगळीची भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी मौन बाळगले आहे. संघाच्‍या नेत्‍यांसोबत चर्चा झाली असून त्‍यांनी कोणतेही वक्तव्‍य केलेले नसल्‍याचे राजनाथ सिंह यांनी स्‍पष्‍ट केले. तर अडवाणींच्‍या मनधरणीबाबत ते काहीही न बोलता निघून गेले. संघाने मोदींचीच पाठराखण केली आहे. भाजपने अडवाणींची मनधरणी करावी, परंतु, मोदींच्‍या मोबदल्‍यात नाही, असे संघाने स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे अडवाणीचे राजीनामास्‍त्र यावेळी फेल करताना दिसत आहे.

पुढे वाचा... शॉटगन शत्रुघ्‍न सिन्‍हांचा सूचक इशारा...