आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजमा संतापल्या, ...तर मी आरोपींवर दगड मारले असते; मनोजला फाशी देण्याची पत्नीसह कुटुंबियांची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्लीत घडलेल्या आणखी एका बलात्कारामुळे सगळा देश हादरला आहे. 'गुडिया'साठी सारे दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. आता त्याचे पजसाद संसदेत उमटत आहेत. सर्वच क्षेत्रातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. दरम्यान, आरोपी मनोज कुमारला तिहार जेलमध्ये इतर कैद्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्मनोजच्या कुटुंबियांनी त्याला फासावर लटविण्याची मागणी केली आहे. मनोजची पत्नी आर्चना देवी हिने त्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. ज्या घटनेने सगळा देश लज्जित झाला आहे, अशी घटना करणा-याला जगण्याचा कोणताही हक्क उरत नाही. मनोजच्या सासू आणि वडिलांनीही त्याला फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.

भाजप खासदार नजमा हेपतुल्‍ला यांनी म्हटले आहे की, बलात्काराच्या घटनेनंतर लोकांची राग व नाराजी योग्य आहे. राज्‍यसभेत बोलताना त्या म्हणाल्या, जर माझ्या हातात दगड असता तर मी बलात्कारातील आरोपींच्या तोंडावर मारला असता. पोलिस आरोपींचा चेहरा कपड्याने का गुंडाळतात. जर त्याने गुन्हा कबूल केला आहे तर त्यांचा चेहरा जनसामान्याला दिसला पाहिजे. असे वाईट कृत्य करणा-यांचा खरा चेहरा लोकांना कळू द्या. आरोपींचा चेहरा झाकल्याने मला त्रास होतोय.

पुढे वाचा नजमा हेपतुल्ला आणि सायना नेहवाल काय म्हणाल्या... क्लिक करा