आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reactor Of India\'s First Indigenous Nuclear Submarine INS Arihant Goes \'critical\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कराचीला उद्धवस्त करू शकते पाणबुडी आयएनएस \'अरिहंत\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जमीन, हवा आणि पाण्यातून अण्वस्त्र हल्ला करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत भारत पोहोचला आहे. जमीनीवरून आणि हवेतून अण्वस्त्र हल्ल्यात पारंगत असलेला भारत आता पाण्यातून मारा करण्यासही सज्ज झाला आहे.

सर्वकाही व्यवस्थित पार पडले, तर पाण्यातून अण्वस्त्र हल्ला करण्याचीही भारताची क्षमता असणार आहे. आयएनएस 'अरिहंत' या पानबुडीचे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर काही तासांपूर्वीच चालू करण्यात आले आहेत. आता ही पाणबुडी समुद्राच्या सफरीवर जाण्यास सज्ज आहे. तिथे तिचे परिक्षण केले जाणार आहे.