आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा भारताची आयर्नलेडी पहिल्यांदा रडली, असा झाला होता संजय यांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- संजय गांधी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाल्यावर रडताना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी. सोबत राजीव गांधी.)
भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला चार दशक पूर्ण होणार आहेत. यावेळी भारताच्या सर्वांत शक्तिशाली पंतप्रधान इंदिरा गांधी हमसून हमसून रडल्या होत्या. 25 जुनला आणीबाणी लागू होण्याच्या घटनेला चार दशक पूर्ण होणार आहे.
नवी दिल्ली- आणीबाणी मागे घेण्यात आल्यावर तीन वर्षांनी संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी समजल्यावर भारताच्या सर्वांत शक्तिशाली पंतप्रधान इंदिरा गांधी पार खसून गेल्या होत्या. यापूर्वी कुणीही इंदिरा गांधी यांनी रडताना बघितले नव्हते. 23 जून 1980 रोजी विमान दुर्घटनेत संजय गांधी यांचे निधन झाले. त्यावर अनेक तर्कवितर्क मांडण्यात आले. पण त्यातील कोणताही खरा किंवा खोटा ठरला नाही. संजय गांधी विमान असे चालवायचे, की कुणी रस्त्यावर कार चालवत आहे.
1976 मध्ये संजय गांधी यांना कमी वजानाची विमाने उडविण्याचा परवाना मिळाला होता. आणीबाणीनंतर मोरारजी देसाई यांच्या सरकारने त्यांचा हा परवाना रद्द केला होता. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर संजय यांना पु्न्हा हा परवाना मिळाला. मे 1980 मध्ये इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संजय यांच्यासाठी पिट्स एस 2ए विमान भारतात आणले होते. या विमानाची जोडणी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर करण्यात आली होती. यासाठी बरीच घाईगडबड करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या फ्लाईंग क्लबला हे विमान सोपविण्यात आले होते.
संजय गांधी यांना या विमानाची चाचणी करायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना याची परवानगी मिळाली नाही. 20 जून 1980 रोजी फ्लाईट इन्स्ट्रक्टरने विमानाचे यशस्वी उड्डाण केले. त्यानंतर 21 जून रोजी संजय यांनी पहिल्यांदा हे विमान उडवले. 22 जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, आई इंदिरा गांधी, आर. के. धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांना घेऊन 40 मिनिटे उड्डाण केले. पण तरीही अघटीत घडलेच.
पुढील स्लाईडवर वाचा, संपूर्ण घटनेचा वृत्तांत....