आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसींविरुद्ध लढल्यास सर्व मते मलाच : अख्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध मी ५०-५० टक्के हिंदू-मुस्लिम मतदार असलेल्या एखाद्या मतदारसंघात लढलो तर सारी मते मलाच पडतील, असा दावा प्रसिद्ध गीतकार, शायर जावेद अख्तर यांनी केला. येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वादग्रस्त विषय नेहमी अडचणी निर्माण करतात, असेही सांगितले.

महाराष्ट्रात उदगीर येथे बोलताना ओवेसी यांनी ‘माझ्या गळ्यावर कुणी सुरी ठेवली तरी भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे वक्तव्य केले होते. यावर राज्यसभेतून खासदार म्हणून निवृत्त होत असताना केलेल्या भाषणात जावेद अख्तर यांनी ओवेसी यांचा चांगलाच समाचार घेतला होता. दरम्यान, जावेद अख्तर यांच्या पत्नी व अभिनेत्री शबाना आझमी यांनी याच कार्यक्रमात बोलताना ज्यांना ही घोषणा द्यायची नसेल त्यांनी "भारत अम्मी की जय' अशी घोषणा द्यायला हरकत नाही, असे मत मांडले.
बातम्या आणखी आहेत...