लंडनमध्ये 1999 ला क्रिकेटचे विश्वचषक खेळले जात होते. भारतीय संघाची या विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरी होती. सुपर सिक्सच्या सामन्यात हारल्यानंतर भारत विश्वचषकातून बाहेर पडला. तरीही भारतीयांसाठी एक समाधानाची बाब होती, ती म्हणजे पाकिस्तानवर 47 धावांनी मिळवलेला विजय. या दरम्यान देशात अजून एक महत्त्वपूर्ण घटना घडली. ही घटना होती कारगिल युध्दाची. 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानला कारगिलमधून पळवून लावले. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात 'विजय दिवस' म्हणून साजका केला जातो. आज divyamarathi.com तुम्हाला कारगिल युध्दाबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहे.
हे युध्द जरी 1999 मध्ये झाले असले तरी याची योजना पाकिस्तानने 1984 लाच बनवली होती. मात्र पाकिस्तानचे राजकारण्यांनी त्यावेळी या योजनेस नकार दिला होता.
कशी झाली युध्दाची सुरूवात
1999 मध्ये कारगिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने मुजाहिदीन बनून ताबा मिळवला होता. सुरूवातील भारतीय सेना पाकिस्तानी सैन्यांच्या या ताब्याच्या बातम्यांचा विरोध करत होती. भारतीय सैन्याला त्यांच्यातील कमतरता बाहेर येऊ द्यायची नव्हती. मात्र अनेक माध्यमांच्या अहवालांनुसार ही बाब उघड झाल्यानंतर भारत सरकारने कारगिल कार्यवाहीस सुरूवात केली. कारगिलच्या या युध्दाला जरी 14 वर्ष झाले असतील, मात्र भारतीय जवानांच्या धाडसाच्या कथा अजूनही जनतेच्या मनामनात जिवंत आहेत.
अजूनही मनात येतात अनेक प्रश्न
या युध्दाचे नेमके कोणते कारण होते? पाकिस्तानने या युध्दास का सुरूवात केली? पाकिस्तानला यातून काय मिळवायचे होते? तत्कालिक पाकिस्तानी सेना प्रमुख परवेझ मुशर्रफने पंतप्रधान नवाज शरिफ यांना या योजनेबद्दल का कोणतीच माहिती दिली नाही.? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे या दोन्ही देशातील जनतेला अजूनही पडतात.
पाकिस्तानी लेखक देतात खोटी माहिती
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी सांगतात की, भारतात याबद्दल बरेच काही लिहिण्यात आले, मात्र पाकिस्तानमध्ये जे काही थोडे-फार लिखान झाले आहे, ते लश्कराच्या लोकांनीच लिहिले आहे. त्यामुळे या लिखाणात पाकिस्तानी सैन्याच्या विचारांची झलक दिसते. ज्येष्ठ पत्रकार आणि दुनिया टीव्हीची अँकर नसीम जाहिरा हिने 'कारगिल टू कूपः 50 डेज दॅट श़ॉक पाकिस्तान' नावाचे एक अत्यंत विश्वासार्ह पुस्तक लिहिले आहे.
पुढे वाचा... 1984 च्या एका घटनेत होते कारगिलच्या युध्दाचे बीज......