आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय केले होते टीपू सुलतानने, काय आहे वास्तव?, जाणून घ्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो : टीपू सुलतानचा प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो : टीपू सुलतानचा प्रतिकात्मक फोटो.
नवी दिल्ली - 18 व्या शतकातील मुस्लिम शासक टीपू सुलतान यांची 20 नोव्हेंबर रोजी जयंती साजरी केली जाते. भारताच्या इतिहासात टीपू सुलतानाविषया दोन प्रकारच्या गोष्‍टी सांगितल्या जातात. ती दोन्ही धर्मावर आधारित आहे. आम्ही तुम्हाला त्या दोन गोष्‍टी सांगणार आहोत...
पहिली गोष्‍ट
आपले पिता हैदर अली यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टीपू सुलतानकडे म्हैसूरच्या राज्य कारभाराची सूत्रे आली होती. राज्य कारभाराची सूत्रे स्वीकारताच टीपूने म्हैसूरला मुस्लिम राज्य म्हणून घोषित केले आणि मोठ्याप्रमाणावर धर्मांतरण घडवून आणले. ज्या लोकांनी याचा विरोध केला त्यांना मारण्‍यात आल्याचे सांगितले जाते. महिलांवरही अत्याचार झाली. अनेक लोकांनी आपल्या धर्माच्या लोकांच्या रक्षणासाठी आपल्या मुलांसह तुंगभद्रा आदी नद्यांमध्‍ये उडी घेऊन आत्महत्या केली.
म्हैसूर गॅझेटियर मध्‍ये काय लिहिले गेले आहे ?
दी म्हैसूर गॅझेटियरमध्‍ये लिहिले आहे, की टीपूने जवळजवळ 1 हजार मंदिरे पाडली. 22 मार्च 1727 रोजी सुलतानाने आपला एक सेनापती अब्दुल कादीरला पत्र लिहिले. त्यात धर्मांतर केलेल्या लोकांची संख्‍या देण्‍यात आली होती. जर मला संपूर्ण जगही मिळाले, तरी मी जे काम करत आहे ते चालूच ठेवले, असे टीपूने म्हटले असल्याचे 'फ्रीडम स्ट्रगल इन केरल' या पुस्तकात उल्लेख आहे.
दुसरी गोष्‍ट :
टीपू सुलतान यांचे वडील हैदर अली स्वत: म्हैसूर साम्राज्याच्या लष्‍करात सैनिक होते. त्यांचे पूर्ण लष्‍करावर नियंत्रण होते. अली यांनी 1761 मध्‍ये म्हैसूरची राज्य कारभार आपल्या हाती घेतला. टीपू सुलतानने आपल्या पित्याचे साम्राज्य वाढवण्‍यासाठी सिंहासनवर बसले. टीपू सुलतान एक अजब यौध्‍दा, योग्य शासक, विद्वान आणि कवीही होता. तो राम नावाची अंगठीही घालायचा, असे सांगितले जाते. ही अंगठी युध्‍दात सुलतानाचे मृत्यू झाल्यानंतर इंग्रज अधिका-याने काढून घेऊन ब्रिटनमधील एका लिलावात विकले. मग प्रश्‍न उरतो, की त्याने हिंदूंवर अत्याचार केले असतील तर ही अंगठी का तो घालायचा. असे सांगितले जाते, की जेव्हा इंग्रज भारतावर नियंत्रण मिळवण्‍याचा प्रयत्न करित होते तेव्हा दक्षिण भारतातून त्यांना टीपू सुलतानाने अडकाव केला होता. इंग्रज ही त्याच्या पराक्रमाने आश्‍चर्यचकित झाले होते आणि त्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ते आपल्याबरोबर त्याची तलवार ब्रिटनमध्‍ये घेऊन आले. त्याने प्रत्येक असे काम केले जे एका राजाला आपली सत्ता संरक्षणासाठी करावे लागले आहे.
टीपूने केला होता पहिल्यांदा रॉकेटचा उपयोग :
टीपू सुलतानने इंग्रजी फौजांविरुध्‍द रॉकेट्सचा उपयोग केला होता. 1772 आणि 1799 मध्‍ये श्रीरंगपट्टणममध्‍ये दोन लढाया झाल्या. यात त्याच्या सैन्याने 6 ते 12 पौंडापर्यंतचे रॉकेट ब्रिटिशांवर डागले. हे रॉकेट लोखंडाच्या नळीपासून बनवली गेली होती.
इंग्रज कर्नलने काय लिहिले आहे ?
कर्नल बेली नावाच्या एका इंग्रजाने लिहिले आहे, की रॉकेटवाल्यांमुळे आमचे चालणे फीरणे मुश्किल झाले होते. प्रथम निळा प्रकाश चमकत आणि नंतर रॉकेट्सचा मारा सुरु व्हायचा. त्यांच्या 20-30 फुट लांबीमुळे लोक मरत, जखमी व्हायचे. रॉकेट्सचा विकास टीपूचा पिता हैदरअलीने केले होते. श्रीरंगपट्टणमचे युध्‍द ब्रिटिशांनीच जिंकले. टीपूला युध्‍द दंउ आणि राज्याचा भाग सोडावा लागला. त्याने आपले दोन मुलांना ओलिस म्हणून इंग्रजांच्या स्वाधीन केले होते. टीपू सुलतानच्या तोफा, बंदूक आणि रॉकेट्स लंडनचे प्रसिध्‍द सायन्स म्युझियममध्‍ये ठेवली गेली आहे. जी इंग्रजांनी 18 व्या शतकात आपल्या बरोबर ब्रिटनमध्‍ये नेली होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा छायाचित्रे...