आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NoFakeNews Reality Check Of Braid Chopper Cutting Off Womens Hair By Choti Biting Insect

#NoFakeNews: महिलांचे केस कापणाऱ्या \'मैकी\'चे हे सत्य आले समोर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंटरनेटवर एक अशी बातमी आणि मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यात म्हटले आहे की राजस्थान सरकारने महिलांचे केस कापणारी व्यक्ती शोधून काढली आहे. ही कोणी व्यक्ती नसून मैकी नावाचा किडा आहे. हा किडा केवळ पावसाळ्यातच बाहेर पडतो. उडत हा किडा महिलांच्या केसावर बसतो. त्यानंतर तो केस खातो. त्यामुळे केस तुटून शेंडी खाली पडते. यावेळी किड्याने सोडलेल्या स्त्रावामुळे व्यक्ती बेशुध्द होते. DivyaMarathi.com ने या दाव्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला.
 
व्हायरल मेसेजमध्ये काय?
- व्हायरल मेसेजमध्ये काळ्या रंगाचा एक काटेदार किड्याचा फोटो दाखवत दावा करण्यात आला आहे की केस कापण्याची घटना सत्य आहे. हे कोणत्याही व्यक्तीने केलेले काम नाही. हा मैकी नावाचा एक किडा आहे. तो केसावर बसून केस कापतो. यावेळी हा किडा एक स्त्राव सोडतो त्यामुळे व्यक्ती बेशुध्द होते. हा किडा दिल्ली आणि परिसरात फिरत असतो. घाबरू नका हा मेसेज सर्वत्र पसरवा त्यामुळे अफवा पसरणार नाही- राजस्थान सरकार
- एका मेसेजमध्ये चीनने भारतावर जैविक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला मैकी किड्याच्या सहाय्याने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा किडा महिलांचे केस खातो. वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला आहे.
 
आमच्या तपासात समोर आले हे सत्य
- व्हायरल मेसेजमध्ये 2 दावे करण्यात येत आहेत. पहिला दावा राजस्थान सरकारने महिलांचे केस कापणाऱ्याचा शोध लावला असा आहे. तर दुसरा दावा हा किडा चिनी असल्याचा आहे. हा किडाच महिलेचे केस कापत असल्याचे सांगण्यात येत आहे.
- पहिल्या दावाची सत्यता पडताळण्यासाठी राजस्थान सरकारचे संकेतस्थळ पाहिले असता अशी कोणतीही माहिती दिसून येत नाही. 
- दुसऱ्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी इनसेक्ट म्यूजियम ऑफ वेस्ट चाइनाचे संकेतस्थळ पाहिले. या संकेतस्थळावर 40 देशातील 50 लाख किड्यांची माहिती आहे. यात त्यांची छायाचित्रे आणि दुर्मिळ प्रजातींची माहिती आहे.
- या संकेतस्थळावरील माहितीनुसार मैकी' किडा Beetle प्रजातीचा हिस्सा आहे. या प्रजातीत एक सारखे दिसणारे अनेक किडे आहेत. हा किडा सर्वात जास्त व्हिएतनाममध्ये आढळतो. 2006 मध्ये अनॉर्ड नावाच्या वैज्ञानिकाने त्याला 'Yumikoi makii' असे जैव वैज्ञानिक नाव दिले.
- शाकाहारी मैकी किडा ओले आणि खराब झालेले लाकूड खातो. मांसाहारी मैकी किडा छोटे किडे खातो. हा किडा माणसाचे केस खात नाही. 
 
आमच्या इंव्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेले निष्कर्ष- 
सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.
- सत्य हे आहे की या घटना का घडत आहेत याचा तपास सुरू आहे. मैकी किडा भारतात आढळत नाही. तो माणसाचे केसही खात नाही.
बातम्या आणखी आहेत...