नवी दिल्ली - सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कॅबिनेट संदर्भात एक नवीन मेसेज व्हायरल केला जात आहे. त्यानुसार, पाकिस्तानने मोदींना खूश करण्यासाठी आणि त्यांच्याकडून फायदा मिळवण्यासाठी प्रथमच एका हिंदू नेत्याला मंत्री केले आहे. सोबत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी आणि नवीन मंत्री दर्शन लाल या दोघांचा कथित फोटो सुद्धा शेअर केला जात आहे. 20 वर्षांत पाकिस्तानने एका हिंदूला मंत्री केल्याची ही पहिलीच वेळ आहे असेही त्यामध्ये म्हटले जात आहे. या मेसेजमधील तथ्य DivyaMarathi.com ने जाणू घेण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हायरल मेसेजमध्ये नेमके काय?
- व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये शपथ घेताना एका नेत्याचा फोटो पाठवला जात आहे. तसेच त्यामध्ये पाकिस्तानने 20 वर्षांत पहिल्यांदाच एका हिंदूला मंत्री केले असा दावा केला जात आहे.
- याबाबत आणखी एका मेसेजनुसार, पाकिस्तानने नवे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना मोदींकडून फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळेच मोदींना खूश करण्यासाठी त्यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये दर्शन लाल यांना स्थान दिले. पाकिस्तानच्या बाबतीत मोदी सरकारचे हे सर्वात मोठे यश आहे.
इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेले सत्य- व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये 2 प्रकारचे दावे केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे, पाकिस्तानने 20 वर्षांत पहिल्यांदाच एका हिंदू नेत्याला मंत्री केले. दुसरा दावा असा, की छायाचित्रात शपथ घेणारे मंत्री दर्शन लाल आहेत.
- दोन्ही मेसेजचे सत्य पडताळून पाहण्यासाठी आम्ही पाकिस्तान सरकारच्या सरकारी संकेतस्थळाला भेट दिली. सर्च करताना आम्हाला दर्शन लाल उर्फ डॉ. दर्शन यांची माहिती सापडली.
- वेबसाइटनुसार, 1 ऑगस्टला दर्शन लाल यांनी राज्य मंत्री पदाची शपथ घेतली आहे. एका हिंदू नेत्याने पाकिस्तानच्या मंत्री पदी विराजमान होण्याची 20 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
- मात्र, तपासात दर्शन लाल यांच्या फोटोबद्दल केलेला दुसरा दावा खोटा निघाला आहे. व्हायरल मेसेजमध्ये ज्या व्यक्तीचा फोटो आहे तो दर्शन लाल यांचा फोटो म्हणून पसरवला जात आहे. प्रत्यक्षात हा फोटो दर्शन लाल यांचा नसून पाकचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांचा आहे.
- दर्शन लाल यांचा फोटो पाकिस्तानी संसदेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
(
हिंदू मिनिस्टर दर्शन लालचा खरा फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
- केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर भारतातील विविध माध्यमांनी सुद्धा सोशल मीडियावर दर्शन लाल यांचा खोटा फोटो प्रसिद्ध केला आहे.
इन्व्हेस्टिगेशन रिजल्ट : सोशल मीडियावरील दावा केवळ अर्धसत्य
- पाकिस्तानच्या नव्या सरकारमध्ये दर्शन लाल यांच्या स्वरुपात 2 दशकांत पहिला हिंदू मंत्री लाभला हा दावा खरा आहे. मात्र, दर्शन लाल यांचा फोटो म्हणून जाहीर केल्या जाणारा दावा खोटा आहे.