आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NoFakeNews Reality Check Of Government Order On Link Aadhaar With Land Records Till 14 Aug

#NoFakeNews: आधार लिंक नसलेली संपत्ती 15 ऑगस्टपासून अवैध, सरकार करणार जप्त?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या व्हायरल मेसेजची divyamarathi.com ने पडताळणी केली आहे. - Divya Marathi
या व्हायरल मेसेजची divyamarathi.com ने पडताळणी केली आहे.
नवी दिल्ली - सध्या एक मेसेज इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 14 ऑगस्टपर्यंत आपली सर्व स्थावर मालमत्ता आधार लिंक करा. घर, दुकान, जमीन, प्लॉट किंवा फ्लॅट यासारखी संपत्ती 14 ऑगस्टपर्यंत आधारशी जोडली नाही तर ही संपत्ती बेकायदेशीर ठरवून सरकार जप्त करेल. यासाठी मोदी सरकारने सर्व राज्यांना पत्रही पाठवल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. divyamarathi.com ने या व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
काय आहे व्हायरल मेसेज?
 - व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, की 1950 नंतरच्या सर्व स्थावर मालमत्ता या 14 ऑगस्ट पर्यंत आधारसोबत जोडून घ्याव्या. हा नियम सर्व भारतीयांना लागू आहे. मोदी सरकार 15 ऑगस्ट पासून निनावी संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार आहे. आधार लिंक नसलेली संपत्ती अवैध मालमत्ता ठरवून  सरकार जमा होईल.  
- या मेसेजसोबत राष्ट्रपती भवनाचे एक पत्रही जोडण्यात आले आहे. त्यासोबत म्हटले आहे, आणखी एका डोकेदुखीला तयार राहा. नोटबंदीनंतर 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नवे सर्जिकल स्ट्राइक करणार आहे. बेनामी संपत्तीविरोधात हे सर्जिकल स्ट्राइक असणार आहे. यापासून वाचण्यासाठी 14 ऑगस्ट पूर्वी आपली सर्व संपत्ती आधार क्रमांकासोबत जोडून घ्यावी. अन्यथा जप्तीच्या कारावाईला सामोरे जावे लागेल. 

समोर आले हे सत्य 
- राष्ट्रपती भवन आणि मोदी सरकारच्या हवाल्याने संपत्ती आधार लिंक करण्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येत आहे. या मेसेजचे सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी दोन अधिकृत वेबसाइट तपासल्या. बरीच पडताळणी केल्यानंतरही असे कोणतेही आदेश मिळाले नाही. 
- तपास अधिक पुढे नेत राष्ट्रपती भवन आणि पीएमओ, पीआयबीचे अधिकृत ट्विटर हँडल येथे तपासणी केली. कारण सरकारसंबंधीत मोठ्या निर्णयांची माहिती अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केली जाते. या शोध मोहिमेत व्हायरल मेसेज संबंधी पीआयबीचे एक ट्विट सापडले. 
- पीआयबीच्या ट्विटनुसार, राष्ट्रपती भवनातून जारी पत्राच्या हवाल्याने 14 ऑगस्ट पर्यंत संपत्ती आधारलिंक करण्याचा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे.  यासंबंधी भारत सरकारने कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत. सरकारने या बनावट पत्राबाबत पोलिसात तक्रारही दाखल केलेली आहे. 
- त्यामुळे 14 ऑगस्ट पर्यंत संपत्ती आधार लिंक करण्याचा मेसेज हा सपशेल खोटा आहे. 
 
पडताळणीतून काय समोर आले
- सत्य हे आहे की, 14 ऑगस्टपर्यंत संपत्ती आधार लिंक करण्याचा फिरत असलेला मेसेज फेक आहे. सरकारने असे कोणतेही आदेश दिलेले नाही. कोणतीही संपत्ती बेनामी आणि अवैध ठरणार नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणते मेसेज फिरत आहे सोशल मीडियावर... 
बातम्या आणखी आहेत...