आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2000 रुपयांच्या नोटेवरील चूक झाली Viral, हे आहे सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन हजार रुपयांच्या नव्या नोटेचे जनतेमध्ये प्रचंड उत्सूकता आणि अप्रुप आहे. या नोटेमध्ये GPS असून त्यावर अंतराळातून नजर ठेवली जाईल अशीही अफवा पसरली आहे. आता वेगळ्या कारणाने ही नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोच्या माध्यमातून सांगितले जात आहे की नोटेवर मिसप्रिंट झाले आहे. एवढेच नाही तर लवकरच ही नोट बंद होणार असल्याचीही अवई उठवली जात आहे.
काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य
- काही युजर्सनी सोशल मीडियावर 2000 रुपयांच्या नव्या नोटेचे फोटो टाकून त्यात चुका शोधण्यास सुरुवात केली आहे.
- सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमध्ये दोनवेळा दोन हजार रुपया आणि दोन हजार रुपये असा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.
- त्यासोबतच ही मोठी चूक असून यामुळे लवकरच ही नोट चलनातून बाद केली जाईल असाही इशारा दिला जात आहे.
का छापले दोनवेळा दोन हजार रुपये
- आरबीआयच्या नियमांनुसार एका नोटेवर 17 भाषांमध्ये तिचे मुल्य लिहिलेले असते. नोटेचे मुल्य मुख्यतः हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेले असते. उर्वरित 15 भाषांमध्ये मागील बाजूने लिहिलेले असते.
- यामध्ये आसाम, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश असतो.
- फोटोतील सत्य - आता ज्या शब्दांबद्दल अफवा पसरवली जात आहे तो शब्द कोंकणी आहे. दुसरा मराठी भाषेतील आहे. दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य आहे. दोन याला दोन्ही भाषेत दोनच म्हटले जाते.
- फरक फक्त एवढा आहे की कोंकणीमध्ये दोन हजार रुपया लिहिले जाते आणि मराठीत दोन हजार रुपये. त्यामुळे नोट बंद होण्याची निव्वळ अफवा आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...