आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत- पाकमध्ये येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत भीषण युद्धाचा दावा, भविष्यवाणी वायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्धाबाबत सोशल मिडियात चर्चेला सध्या ऊत आला आहे. - Divya Marathi
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्धाबाबत सोशल मिडियात चर्चेला सध्या ऊत आला आहे.
नवी दिल्ली- उरीतील आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या मॅसेज सोशल मीडियात वायरल होत आहेत. त्यातच आता दोन्ही देशांदरम्यान भीषण युद्ध होईल असा एक दावा आणि मॅसेज सध्या सोशल मीडियात खळबळ माजवत आहे. खरं तर हा मॅसेज म्हणजे युद्धाबाबत केलेली एक अशी भविष्यवाणी आहे ज्याबाबतचे एका वृत्तपत्राने वृत्त छापले आहे. काय आहे सत्य, कोणी केली भविष्यवाणी...
- गुजरातमधील अहमदाबादचे एक ज्योतिषी व्यापक लोढा यांनी एका लेखात भविष्यवाणी केली आहे. सुमारे 6 महिन्यापूर्वी ही भविष्यवाणी केली होती तसेच हिंदीतील एका जुन्या वृत्तपत्राने तो लेख छापला होता.
- दोन्ही देशाची कुंडली आणि इतर ज्योतिषीय आधारावर व्यापक लोढाने दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान 10 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत भीषण युद्धाचा संभव आहे.
- सोशल मीडियात हा मॅसेज वायरल झाला आहे. तसेच तो खूप शेअर केला जात आहे.
व्यापक यांच्या भविष्यवाणीबाबत प्रश्नचिन्ह-
- मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात खूपच तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देश एकमेंकाविरूद्ध युद्ध करण्याच्या स्थितीतही आहेत.
- मात्र, इतर अनेक ज्योतिषांनी दावे करत व्यापक लोढाच्या भविष्यवाणीला चुकीचे ठरवले आहे.
- सोशल मीडियात एका ज्योतिषीच्या म्हणण्यानुसार सांगितले जात आहे की, भारत-पाकिस्तान यांची कुंडलीच्या आधारावर जे काही सांगितले जात आहे ते चुकीचे आहे.
- भारताच्या आधी एक दिवस पाकिस्तान स्वतंत्र झालाय पाकची मेष लग्न कुंडली आहे. 14-15 च्या रात्रीसोबतच भारत स्वतंत्र झाला त्यावेळी वृषभ लग्न कुंडली बनते. दोन्ही देशांच्या कुंडली पाहता तणावाची शक्यता खूप आहे. ते दिसून येतेही मात्र युद्धासारखी स्थिती आता अजिबात नाही.
याआधीही झाली होती युद्धाची भविष्यवाणी-
- याआधी युद्धाची भविष्यवाणी झाली होती. नास्त्रेदमसने दुस-या महायुद्धाचे भाकित केले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वायरल बातम्याचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...