आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reality Of Ram Rahim Shifted To Rohtak By Gautam Adani Helicopter From Panchkula

#NoFakeNews: अदानींच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून तुरुंगात पोहोचला बाबा रामरहिम?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंटरनेटवर सध्या बाबा रामरहिम आणि पीएम मोदी एकच हेलिकॉप्टर वापरत असल्याचे फोटोज व्हायरल होत आहेत. सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलेला बाबा रामरहिम उद्योजक अदानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून रोहतक तुरुंगात पोहोचला असे सांगितले जात आहे. मोदींनी वेळोवेळी आपल्या हवाई दौऱ्यांमध्ये याच हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. DivyaMarathi.com या व्हायरल दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत आहे. 
 

व्हायरल मेसेजमध्ये नेमके काय?
>> व्हायरल होणाऱ्या मेसेजेसमध्ये दोन फोटोज जोडून दाखवले जात आहेत. त्यापैकी एक फोटो बाबा रामरहिम हेलिकॉप्टरमध्ये बसून तुरुंगात जात असतानाचे दिसत आहे. तर, शेजारच्या दुसऱ्या छायाचित्रात पीएम मोदी एका हेलिकॉप्टरमध्ये बसून जात असल्याचे दिसून येत आहे. दोघांच्या हेलिकॉप्टरवर नमूद असलेले नंबर गोल करून दाखवले जात आहे. आणि दोघांचे काय कनेक्शन? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
>> इतर मेसेजेसमध्ये सुद्धा हेच दोन फोटो लावून मोदी AW139 (ऑगस्ता वेस्टलँड-139) हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये त्याच रंगाच्या हेलिकॉप्टरमध्ये बाबा रामरहिम दिसत आहे. ते दोन्ही हेलिकॉप्टर एकच गौतम अदानी यांचे आहे असा दावा केला जात आहे. सोबत यामुळेच भाजप सरकार बाबाच्या भक्तांवर कारवाई करताना दिसली नाही असेही म्हटले जात आहे.
 

इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेले सत्य
>> रामरहिमला पंचकुला कोर्ट ते रोहतक तुरुंगापर्यंत हेलिकॉप्टरमध्ये जाण्याची व्यवस्था हरियाणा सरकारने केली होती. त्यामुळे आम्ही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव राम यांच्याशी बातचीत केली. 
>> राम निवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामरहिमला ज्या AW-139 हेलिकॉप्टरमधून रोहतकला पोहोचवण्यात आले, तो हेलिकॉप्टर सरकारने एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेतले होते. अडानीने हेलिकॉप्टर पुरवल्याचा दावा खोटा आहे. कुठल्याही आरोपीला दोषी ठरवल्यानंतर त्यासंदर्भात आवश्यक नियोजन करणे सरकारची जबाबदारी आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने बाबाला हेलिकॉप्टरमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.
>> इन्व्वेस्टिगेशनमध्ये याचा पत्ता तर लागला की बाबा रामरहिमला तुरुंगाकडे नेणारे हेलिकॉप्टर अदानींचे नव्हते. मात्र, हे जाणून घ्यावे लागेल, की अदानी यांच्याकडे सुद्धा AW139 हेलिकॉप्टर आहे का?
>> याची पडताळणी करण्यासाठी आम्ही इंटरनेट सर्च केले. त्यानंतर बेंगळुरू येथे पार पडलेल्या 'एयरो इंडिया 2011' ची लिंक सापडली. या लिंकमध्ये पान क्रमांक 16 वर AW139 हेलिकॉप्टर बनवणाऱ्या कंपनीला अदानी यांनी ऑर्डर दिल्याचे नमूद आहे. यात हे सुद्धा लिहिले होते, की अदानीच नव्हे, तर भारतातील 20 जणांनी ते खरेदी केले. अर्थात 2011 मध्ये भारतात असे 20 हून अधिक हेलिकॉप्टर होते. 2017 पर्यंत त्यांचा आकडा वाढण्याची शक्यता नकारता येणार नाही. 
(अदानी समूहाकडून हेलिकॉप्टर खरेदीचे ऑर्डर, याबाबत वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
 

इन्व्हेस्टिगेशन रिजल्ट: सोशल मीडियावर केले जाणारा दावा खोटा
सत्य असेच आहे, की ज्या हेलिकॉप्टरने रामरहिमला रोहतक तुरुंगाकडे पाठवण्यात आले, ते हरियाणा सरकारने एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेतले होते. अदानी यांनीही 2011 मध्ये अशाच प्रकारचे AW-139 हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली होती. देशात अशाच प्रकारचे जवळपास 20 हून अधिक हेलिकॉप्टर आहेत. त्यामुळेच, हेलिकॉप्टरवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...