आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NoFakeNews Reality Of RBI Order 500 & 2000 Rupees Note Not Available In ATM From October

#NoFakeNews: 1 ऑक्टोबरपासून ATM मधून मिळणार नाही 500-2000 रुपयांच्या नोटा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1 ऑक्टोबरपासून देशातील सर्व बँकांच्या एटीएम मधून 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा मिळणे बंद होणार आहे. फक्त 100 रुपयांच्याच नोटा मिळणार. असा मेसेज जर तुमच्याकडे आला असेल तर तो खरा आहे की खोटा हे DivyaMarathi.com आता तुम्हाला सांगणार आहे. 
 
काय होत आहे व्हायरल
- सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. एक मेसेज सध्या सर्वत्र फिरत आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा 1 ऑक्टोबरपासून एटीएममधून मिळणार नाही. फक्त 100 रुपयांच्या नोटा मिळतील. तसे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केले आहे.  
- यासोबतच आणखी एका मेसेजमध्ये पुन्हा नोटबंदीचे वादळ घोंघावते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दिवाळीपासून एटीएममधून 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाही. अखेर तुघलक साहेबांचा इरादा आहे तरी काय? 
 
DivyaMarathi.com ची पडताळणी 
- DivyaMarathi.com ने या संदर्भात  चौकशी केली. त्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर सर्च केले. बरीच शोधाशोध केल्यानंतरही ऑक्टोबरपासून 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा एटीएम मधून मिळणार नसल्याबाबतचे आदेश सापडले नाही. 
- अधिक पडताळणी केल्यानंतर आरबीआयच्या आर्काइव्हमध्ये 2 नोव्हेंबर 2016 चा एक आदेश सापडला. त्यात आरबीआयने करन्सी डिस्ट्रीब्यूशन आणि एक्सचेंज स्कीमचा (CDES) हवाला देत बँकाना म्हटले होते की आरबीआय एक पायलट प्रोजेक्ट हाती घेणार आहे. त्याद्वारे देशातील 10% एटीएममधून 100 रुपयांच्या नोटा मिळतील. 
- हा आदेश लागू करण्यासाठी बँकांना तयारीसाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र यात असे कुठेही म्हटले नव्हते की ऑक्टोबर 2017 पासून देशातील सर्व एटीएममधून फक्त 100 रुपयांच्या नोटा निघतील. 
- यानंतर व्हायरल होत असल्याचे मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही आरबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विचारणा केली. ते म्हणाले, हा मेसेज खोटा आणि बनावट आहे. व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये. 
- देशातील 10% एटीएम मधून फक्त 100 रुपयांच्या नोटा निघतील हे गेल्यावर्षीचे पत्र आहे. तेव्हा भारतात 100 रुपयांच्या नोटांची कमतरता होणार नाही यासाठी ते जारी केले होते. 
 
नोटबंदी 
- गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 8 वाजता देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आज (8 नोव्हेंबर 2016) रात्री 12 वाजतापासून 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. 
बातम्या आणखी आहेत...