आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NoFakeNews: आज रात्री फोन बंदच ठेवा, मोबाईलचा स्फोट होण्याचा धोका - NASA?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंटरनेटवर सध्या व्हायरल होणाऱ्या एका मेसेजमध्ये आज मध्यरात्रीनंतर मोबाईल फोन बंद ठेवण्याचे सांगितले जात आहे. रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत आकाशातून कॉस्मिक किरण वाहणार आहेत. त्यामुळे, या वेळेत मोबाईल फोन बंदच ठेवा. फोन ऑन ठेवून किंवा जवळ ठेवून झोपण्याची चूक मुळीच करू नका. ज्यांचा फोन या वेळेत ऑन असेल तर टॉवरमुळे फोनमध्ये स्फोट होईल. असा इशारा सुद्धा दिला जात आहे. DivyaMarathi.com ने या दाव्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आहे. 

व्हायरल मेसेजमध्ये आणखी काय?
- व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दावा केला जात आहे, की आज रात्री 12.30 ते पहाटे 3.30 पर्यंत मंगळ ग्रहातून कॉस्मिक किरणा निघणार आहेत. पृथ्वीवरून जाणाऱ्या या किरणांमुळे मोबाईलचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे, आप-आपले मोबाईल फोन कृपया बंदच ठेवा. फोन जवळ ठेवून झोपण्याची चूक अजिबात करू नका. या मेसेजवर दुर्लक्ष केल्यास तुमचेच नुकसान होईल.
- विश्वास बसत नसेल तर गुगलवर 'नासा बीबीसी न्यूज' असे सर्च करून तपशील वाचू शकता. हा मेसेज जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
- याबाबत आणखी एका मेसेजमध्ये लिहल्याप्रमाणे, 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत फोनमध्ये टॉवरच्या माध्यमातून घातक किरण पोहचतील आणि मोबाईलचा स्फोट होईल. 

आमच्या तपासात समोर आलेले सत्य
- मेसेजेसमध्ये 2 दावे केले जात आहेत. पहिला म्हणजे, 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत मोबाइल फोन स्विच ऑन राहिल्यास स्फोट होईल. दुसरा असा की मंगळ ग्रहावरून घातक कॉस्मिक रे वाहतील.
- दावा करताना नासाचा दाखला देण्यात आल्याने आम्ही सर्वप्रथम नासाच्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला. कितीही सर्च केल्यानंतर आम्हाला 12:30 ते 3:30 पर्यंत मोबाईल फोन बंद ठेवण्याबाबतचा इशारा कुठेही दिसला नाही. मात्र, या वेबसाईटवर कॉस्मिक रे संदर्भातील एक माहिती सापडली.
- नासाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे, कॉस्मिक-रे कुठल्याही ग्रहातून येणे अशक्य आहे. कॉस्मिक रे ह्या ताऱ्यांमधून निघतात. मंगळ हा एक ग्रह आहे. त्यामुळे, मंगळातून कॉस्मिक रे निघण्याचा सवालच नाही.
- व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असलेला दावा पडताळण्यासाठी आम्ही मिनिस्ट्री ऑफ सायन्सचे वैज्ञानिक आर. पयप्पन यांच्याशी बातचीत केली. त्यांनी हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट केले. मंगळ ग्रहातून कधीही कॉस्मिक रे निघत नाहीत. त्यामुळे, कुठल्याही फोनमध्ये ब्लास्ट होणार नाही. ब्रह्मांडात ताऱ्यांमधून निघणाऱ्या किरणांना कॉस्मिक रे असे संबोधले जाते. 

इन्व्हेस्टिगेशन रिजल्ट : सोशल मीडियाचा दावा खोटा
सत्य हेच आहे, की मंगळासह कुठल्याही ग्रहातून कॉस्मिक रे निघत नाहीत. त्यामुळे, आज रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत मोबाईल फोनचा स्फोट होणार हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
बातम्या आणखी आहेत...