आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NFN Exclusive: खोटी निघाली दाऊदची 42 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याची बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंटरनेटवर सध्या एक बातमी व्हायरल होत आहे, यात मोदी सरकारला दाऊदच्या बाबतीत मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे, मोदींच्या कुटनितिसमोर हारून ब्रिटीश सरकारने दाऊद इब्राहिमची मिडलँड येथील 42 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, मोदीचे दाऊदच्या विरोधात आत्तापर्यंतचे हे सर्वात मोठे पाऊल आहे, देशातील माध्यमांनीहीही ब्रिटीश वृत्तपत्राच्या आधारे हा दावा केला आहे. व्हायरल झालेला या दाव्याचा divyamarathi.com शोध घेत आहे... 

काय झाले व्हायरल?
> व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, डॉन दाऊद विरोधात मोदी सरकारने मोठी कारवाई... पंतप्रधानांच्या कुटनितीसमोर ब्रिटन सरकार झुकले... दाऊद इब्राहिमची 43 हजार कोटींची संपत्ती जप्त... अच्छे दिन, गुन्हेगार आणि दहशदवाद्या विन... 

> यासंबंधीत इतर मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की, मोदींची विदेशनीती यशस्वी झाली. मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका... मोदीच्या सांगण्यावरून ब्रिटनमध्ये असलेल्या दाऊदच्या 42 कोटींची संपत्ती झाली जप्त...

आमच्या तापासातून समोर आले हे सत्य...
> व्हायरल मेसेजमधील दावा ब्रिटीश सरकार आणि ब्रिटिश मीडियाच्या हवाला देत करण्यात येत आहे. त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वात आधी ब्रिटीश गव्हर्नमेन्टच्या ऑफिशिअल वेबसाइटवर यासंबंधीत माहिती शोधली. परंतु, तेथे यासंबंधी कोणतेही नोटीफिकेशन मिळाले नाही.
 
>ब्रिटनमध्ये सरकार कडून कोणतीही संपत्ती जप्त करण्याचे काम UK सरकारचे 'एच एम ट्रेजरी' मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळे सत्य शोधण्यासाठी आम्ही लंडनमध्ये असलेले 'एच एम ट्रेजरी' मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी गॅरेथ जोन्स यांच्याशी संपर्क साधला. ब्रिटनमध्ये अर्थ मंत्रालयाला 'एच एम ट्रेजरी' संबोधले जाते.

> जोन्स यांनी divyamarathi.com शी बोलताना सांगितले की, ब्रिटीश सरकारद्वारे दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त करण्यात आल्याची बातमी पुर्णपणे खोटी आहे. सरकारच्या 'एच एम ट्रेजरी'ने संपत्ती जप्त करण्याची कोणतीही कारवाई केलेली नाही. दाऊद इब्राहिमचे नाव सरकारच्या  FINANCIAL SANCTIONS TARGET यादीमध्ये 182 नंबरवर जरूर मेंशन करण्यात आले आहे. पण संपत्ती जप्तीसारखी कोणतीही कारवाई झाली नाही. पुढे जशी परिस्थिती निर्माण होईल तसे पाऊल उचलण्यात येईल.
 
> नियमानुसार, FINANCIAL SANCTIONS TARGET यादीत नाव लिहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची संपत्ती सरकार जप्त करेलच असे गरजेचे नाही. जर संपत्ती गोठवण्याच्या प्रक्रियेत सिद्ध झाले की, ही संपत्ती अवैध यादीत नाव असलेल्या गुन्हेगार किंवा दहशतवाद्याच्या नावावरच आहे, तेव्हाच ती जप्त करण्यात येते. 'एचएम ट्रेजरी' मंत्रालयाकडून वेळोवेळी या यादीत नावे जोडण्यात येतात.
 
> तापासादरम्यान आम्ही ब्रिटीश सरकारची ती गुप्त यादीही मिळवली, ज्यामध्ये 182 नंबरवर दाऊद इब्राहिमचे नाव देण्यात आले आहे. परंतु, या यादीत दाऊदचे नाव मोदी सरकारच्या काळात नाही, तर 2012 मध्ये कॉंग्रेसच्या काळातच जोडण्यात आले होते.
 
> तपासात पुढे आम्ही लंडन येथील पत्रकार अमरदीप बैसी यांच्याशीही संवाद साधला. हे तेच पत्रकार आहे ज्यांची दाऊदची संपत्तीविषयीची बातमी ब्रिटीश माध्यमे 'बर्मिंघम मेल' आणि 'मिरर'ने 12 सप्टेंबरला छापली होती. भारतीय माध्यामांनीही याच बादमीचा हावाला देत दाऊदची संपत्ती जप्त झाल्याची बातमी चालवली.
 
> पत्रकार अमरदीप यांनी divyamarathi.com ला सांगितले, भारतीय माध्यामांनी माझ्या बातमीचा चुकीचा अर्थ काढला. दाऊदची संपत्ती अजून जप्त झाली नाही. सध्या केवळ गोठवण्याच्या प्रक्रियेत आहे. संपत्ती गोठवणे आणि जप्त करण्यात फरक असतो. गोठवण्याच्या प्रक्रियेत संपत्ती चौकशीच्या घेऱ्यात असते आणि जप्ती प्रक्रियेत संपत्ती पुर्णपणे जप्त होत असते. 'मिरर'मध्ये छापलेली माझी बातमी संपत्ती गोठवण्याच्या प्रक्रियेत असल्याचा उल्लेख आहे, जप्तीचा नाही.
 
तपासाचा निकाल: सोशल मीडियावर करण्यात येणारा हा दावा पुर्णपणे खोटा...!
सत्य हे आहे की दऊदची संपत्ती ब्रिटिश सरकारने जप्त केली नाही. अद्याप प्रकरण संपत्ती गोठवण्याच्या प्रक्रियेत आहे. या प्रक्रियेत जर सिद्ध झाले की, ही संपत्ती दाऊदची आहे, तर कदाचित जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येऊ शकते. परंतु, या लिस्टमध्ये दाऊदचे नाव 2012 पासून आहे आणि तेव्हापासून केवळ गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा सोशल मीडियावरील ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...