आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reasons Behind Success Of Arvind Kejriwal And AAP

'आप'ने बदलली सर्व समीकरणे, जाणून घ्‍या केजरीवाल यांच्‍या यशाची कारणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अरविंद केजरीवाल यांच्‍या आम आदमी पार्टीने दिल्‍लीत धडाकेबाज कामगिरी करुन सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला. स्‍वतः पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांना 25 हजार मतांनी पराभव करुन कर्णधाराची खेळी केली. अरविंद केजरीवाल आणि त्‍यांच्‍या पक्षाला चमत्‍कारिक यश मिळाले आहे.

केजरीवाल यांनी गेल्‍या वर्षी आम आदमी पार्टीची स्‍थापना केली. अण्‍णांसोबत जनलोकपाल विधेयकासाठी केलेल्‍या आंदोलनात राजकीय पक्षांनी राजकारण करुन विधेयक संसदेत लटकविले. त्‍यामुळे स्‍वतः राजकारणात जाऊन विधेयक मंजूर करुन घ्‍यावे आणि एक स्‍वच्‍छ राजकीय पर्याय जनतेला द्यावा, या हेतूने ते वेगळे झाले. अण्‍णांनी तेव्‍हा टीम अण्‍णा बरखास्‍त केली. त्‍यापैकी बहुतांश्‍ा सदस्‍य 'आप'मध्‍ये आहेत. दिल्‍लीच्‍या रणांगणात 'आप' किती यशस्‍वी होईल, याबाबत बराच संभ्रम होता. अनेकांना हा चिल्‍लर पक्ष वाटला. पक्षाला अगदी मोजक्‍याच जागा मिळतली, असा अंदाज होता. परंतु, 'आप'ने सर्व समीकरणे फोल ठरविली. एग्झिट पोलचे अंदाजही चुकविले.

'आप'च्‍या या चमत्‍कारीक यशाची काही कारणे आहेत... ती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्स्‍वर...