आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दिव्य मराठीच्या वाचकांकडून स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या निर्णयावर divyamarathi.com च्या फेसबुक पेजवर एकूण 90 वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. (फाईल) - Divya Marathi
या निर्णयावर divyamarathi.com च्या फेसबुक पेजवर एकूण 90 वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. (फाईल)
औरंगाबाद- आरक्षित वर्गाच्या सवलती घेतल्या तर खुल्या कोट्यातून नोकरी मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला. या पार्श्वभूमिवर divyamarathi.com ने सोशल मिडियावर एक पोल घेतला. वाचकांनी या पोलवर उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे काही नागरिकांनी स्वागत केले तर काहींनी आरक्षण पुर्णपणे बंद करायला हवे अशा टोकाच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. 
 
आरक्षित वर्गाच्या सवलती घेणाऱ्यांना आता केवळ आरक्षित कोट्यातूनच सरकारी नोकरी मिळेल. आरक्षित कोट्यातून जागा न मिळाल्यास खुल्या कोट्यातील जागा दिल्या जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्या. ए.एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने एक याचिका निकाली काढताना दिला आहे.
या निर्णयावर divyamarathi.com च्या फेसबुक पेजवर एकूण 90 वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातील 61 प्रतिक्रिया निर्णयाच्या बाजूने आल्या आहेत. तर 5 प्रतिक्रिया विरोधात आहेत. 25 प्रतिक्रिया तटस्थ आहेत.
 
वाचकांनी दिला असा प्रतिसाद...
या निर्णयाची वाट पाहता पाहता खुल्या प्रवर्गाच्या अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. आता तरी काही चांगलं होईल अशी अपेक्षा करूयात. अतिशय योग्य निर्णय.
- अनिल देशमुख
 
आर्थिक जनगणना 2011 हीच चुकीची आहे. सदर जनगणनेवरून दर माणशी दर कुटुंब यांच्या उत्पन्नाची कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळेच प्रथम खरे आर्थिक सर्वेक्षण गरजेचे आहे. नंतर जात धर्म किंवा कोणतीही निकष न लावून आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देता येईल.
- राजू भगवंत झावरे पाटील
 
आरक्षण शिक्षणासाठी असावे, पण आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्यांनाच. नोकरीसाठी नसावे कारण निदान तिथे तरी योग्य निवड होईल. आरक्षणाच्या नावाखाली फायदा घेऊन काहीचे पुर्ण कुटुंब नोकरी मिळवते आणि समाजातील इतर अनेक कुटुंब बेरोजगार होतात हे कुठतरी थांबायला हवे.
-अमोल पाटील
 
राखीव कोट्यातील उमेदवाराला खुल्या वर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर त्याला खुल्या वर्गातील उमेदवार समजण्यास हरकत नसावी, मात्र एकदा तो खुल्या वर्गातून भरती झाल्यावर नंतर त्याला खुल्या वर्गातील समजावे.
- प्रदीप शहाणे
 
बातम्या आणखी आहेत...