आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनिक आयडीद्वारे एअरलाइन्सची बंदी घातलेल्या प्रवाशांची छाननी; तिकीट काढताना द्यावा लागेल आयडी क्रमांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने शुक्रवारी देशात प्रथमच नो फ्लाय लिस्ट जारी केली होती. आता मंत्रालयाने गैरवर्तनाचा आरोप असलेल्या प्रवाशांच्या हेराफेरीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि नामसाधर्म्य असलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी मार्ग शोधून काढला आहे. मंत्रालय सर्व प्रवाशांना युनिक आयडी क्रमांक देईल. तो क्रमांक प्रत्येक प्रवाशास तिकीट काढताना द्यावा लागणार आहे.  

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युनिक आयडीच्या प्रारूपावर विविध स्टेक होल्डर्सशी बोलणी करण्यात येत आहेत. युनिक आयडी लागू केल्यानंतर प्रवाशांना तो तिकिटे काढताना, विमान कंपन्यांकडे आपली सर्व वैयक्तिक माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये स्वत:चे नाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख, ई-मेल, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, मोबाइल क्रमांक आदी माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट यापैकी कोणताही एक आयडी क्रमांक द्यावा लागेल. ओळखपत्राची एक कॉपी अपलोड करावी लागणार आहे. यानंतर प्रवाशास यूनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक देण्यात येईल.

एव्हिएशनशी संबंधित सर्व एजन्सीज माहिती एकमेकांना पुरवतील 
एव्हिएशन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांशी संबंधित सर्व डाटा एकत्रित करण्यासाठी एक डाटा हब सेंटर तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विविध एजन्सीजकडून मिळणारा डाटा संग्रहित केला जाईल.  

गैरवर्तनाची होणार नोंद
तिकिटाची नोंदणी करताना युनिक आयडी क्रमांक विमान प्रवासाच्या तिकिटाच्या पीएनआर क्रमांकाशी संलग्न असेल. यामुळे प्रवाशांची सर्व माहिती विमानतळावरील ऑपरेटर, सुरक्षा एजन्सी, विमान कंपन्यांसह इतर संबंधित एजन्सीजकडे जाईल. यानंतर विमानात एखाद्या प्रवाशाने गैरवर्तन केले किंवा उद्धट वर्तन केले तर या  प्रकरणाचा तपशील युनिक आयडीमध्ये नोंदला जाईल. दुसऱ्यांदा तिकीट काढताना एका विशेष सॉफ्टवेअरद्वारे प्रतिबंधित प्रवाशाच्या यादीत त्याचा समावेश केला जाईल. त्यासंबंधी युनिक आयडीला अलर्ट संदेश देईल.  

सिगारेट पिण्यास मनाई : प्रवाशाचे हवाई सुंदरीशी गैरवर्तन 
रांचीहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात एक प्रवासी स्वच्छतागृहात सिगारेट पीत होता. हवाई सुुंदरीने त्यास सिगारेट पिण्यास मनाई केली. तेव्हा त्याने तिच्याशी गैरवर्तन केेले. वाद इतका विकोपाला गेला की विमानाच्या कॅप्टनला सुरक्षा सहायकांकडे मदत मागावी लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या एआय-४१८ िवमानाने रांची विमानतळावरून दुपारी दीड वाजता उड्डाण केले. त्यानंतर एक तासाने हवाई सुंदरीला स्मोक डिटेक्टरद्वारे स्वच्छतागृहात सिगारेट पीत असल्याचे समजले. 
बातम्या आणखी आहेत...