आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recommendation Of Amitabh, Guljar For FTII Chairman

शिफारस अमिताभ, गुलजारची; केंद्राला भावले गजेंद्र चौहान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विनिमयन परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अमिताभ बच्चन, रजनीकांत, गुलजार यांच्यासह सहा नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने त्यांच्याऐवजी महाभारतातील ‘युधिष्ठिर’ म्हणजेच गजेंद्र चौहान यांची निवड केली.

अमिताभ, रजनीकांत, गुलजार यांच्याखेरीज श्याम बेनेगल, अनुपम खेर आणि अदूर गोपालकृष्णन यांचीही नावे राठौर यांच्यासमोर होती; परंतु त्यांनी आपले वरीष्ठ अरूण जेटली यांच्याकडे चौहान यांचेच नाव पाठवले, असे माध्यमांत आलेल्या बातम्यांत म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्यानुसार राज्यवर्धन राठौर यांनी चौहानांच्या नावाची जेटलींकडे शिफारस केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अनुपम खेर यांची प्रतिक्रिया...