आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recommendations By Parliament To Control Prices Of Medicines

सर्व औषधींसाठी मूल्य नियंत्रणाची शिफारस, संसदेच्या स्थायी समितीचा अहवाल सुपूर्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात विक्री केल्या जाणा-या प्रत्येक औषधी मूल्य नियंत्रणाच्या कक्षेत आणण्याची शिफारस संसदेच्या स्थायी समितीने केली आहे. देशात विकली जाणारी प्रत्येक प्रकारची औषधी महत्त्वाची असून रुग्णास जेव्हा गरज भासते तेव्हा त्यांचा उपयोग केला जातो.

सध्या ५०९ औषधींचा आवश्यक यादीत समावेश आहे. या औषधीची कमाल विक्री किंमत राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरण (एनपीपीए) निश्चित करत असते. रसायन आणि उर्वरकाच्या स्थायी समितीची ही शिफारस सोमवारी संसदेत सादर करण्यात आली. आवश्यक औषधीच्या यादीत सर्वच औषधींचा समावेश नसल्याने या समितीने आश्चर्य व्यक्त केले आहे. जीवनावश्यकासोबतच बाजारातील सर्व औषधी स्वस्त दरात मिळायला हव्यात. त्यासाठी औषधींचा कमाल मूल्य निर्धारणाच्या यादीत समावेश व्हायला हवा. शिवाय, औषधी उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणावरील आयातीवरही नियंत्रण लावण्याची शिफारस समितीने केली आहे.

स्थानिक बल्क ड्रग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देऊन अडगळीत पडलेल्या सरकारी कंपन्यांच्या जीर्णोद्धार केला जावा, असेही समितीने म्हटले आहे. ज्यापासून औषधी तयार केल्या जातात त्या रसायनांना बल्क ड्रग म्हटले जाते. २०१३-१४ मध्ये १७ हजार ९४४ कोटी रुपयांचे फार्मा प्रॉडक्ट आयात करण्यात आले. रसायन आणि उर्वरक मंत्रालय त्यांना देण्यात आलेल्या निधीचा वापर करत नसल्याबद्दलही समितीने ठपका ठेवला आहे.