आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nitin Gadkari\'s Helicopter Accident!!! Red Carpet For Nitin Gadkari Caught In His Helicopter\'s Rotor Blades: Haldia

VIDEO: नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले!!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हि़डिओ सौजन्य- बंगाली चॅनल 24 घंटा... - Divya Marathi
व्हि़डिओ सौजन्य- बंगाली चॅनल 24 घंटा...
कोलकाता- केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हेलिकॉप्टर अपघातातून बालंबाल बचावले. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे एका सरकारी कार्यक्रमासाठी गडकरी हेलिकॉप्टरने जात होते. गडकरी यांचे हेलिकॉप्टर इच्छित स्थळी लॅंड होत असताना तेथे टाकण्यात आलेले कार्पेट उडल्याने एकच खळबळ उडाली. हेलिकॉप्टर लॅंड होण्याच्या ठिकाणी कोणत्याही वस्तू ठेवल्या जात नाहीत. तरीही कार्पेट व पत्रे ठेवल्याचे उघडकीस आले आहे. ही सुरक्षितेमधील गंभीर चूक असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, ही कार्पेट पोलिस यंत्रणेने ठेवली होती की भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी कार्पेट ठेवली होती याचा तपास केला जात आहे. मात्र, ही कार्पेट हेलिकॉप्टरच्या हवेने उडाल्याने एकच गोंधळ उडाला होता.
सुदैवाने कॉर्पेट हेलिकॉप्टरच्या पंख्याखाली आली नाहीत व हेलिकॉप्टर पायलटने काळजीपूर्वक व सुरक्षित लँडिंग केले. जर या पंख्यात कार्पेट अडकले असते तर मोठा अनर्थ घडला असता. ही कार्पेट मोठीच्या मोठी होती त्यामुळे पंख्यात अडकली असती गडकरींच्या जीवासह हेलिकॉप्टरमधील सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. आपल्याला माहित असेलच की, साधे पक्षी जरी विमान, हेलिकॉप्टरला धडकले तरी अपघात होतो. मात्र, सुदैवाने असे काही विपरित घडले नाही. गडकरी सुरक्षित असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पुढे छायाचित्राच्या मदतीने पाहा, कसा घडला अपघात...
बातम्या आणखी आहेत...