आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल दगडापासून तयार झालेला ३६७ वर्षे जुन्या लाल किल्ल्याची पडझड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लाल दगडापासून तयार झालेला लाल किल्ला शेकडो वर्षांपासून दिल्ली साम्राज्याच्या हृदयस्थानी होता. १३ मे १६४८ रोजी त्याचे बांधकाम पूर्ण झाले. ३६७ वर्षांनंतरही या किल्ल्याची आन-बान-शान कायम आहे काय, याचे निरीक्षण'भास्कर'ने केले. या इमारतीची पाहणी केली तेव्हा अनेक ठिकाणी पडझड, मोडतोड झाल्याचे दिसून आले. तुम्ही जेव्हा केव्हा किल्ल्यात गेला असाल, तेव्हा दिल्ली गेटमधूनच किल्ल्यात प्रवेश केला असेल? मोगलांच्या काळापासून सर्व मान्यवर लोक याच दरवाजातून आत प्रवेश करत होते. पंतप्रधानही स्वातंत्र्यदिनी येथूनच येतात. लाहोरी दरवाजासमोर झेंडावंदन केले जाते ही गोष्ट निराळी.
लाहोरी गेट सामान्य जनतेसाठी होता. पंतप्रधान सध्या येथूनच लोकांना संबोधित करतात. हा किल्ला शहाजहानने नव्हे, तर औरंगजेबाने बांधला होता. स्वत:ला आणखी सुरक्षित करण्यासाठी त्याने तो उभारला होता. लाल किल्ल्यात प्रवेश करताच त्यातील बारकाव्याची माहिती अमितकुमार यांनी दिली. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली गेटमधून प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता.
किल्ल्याची देखभाल आणि संरक्षण याच खात्याकडे आहे. नौबत दरवाजात काचेची फ्रेम आहे. त्यापाठीमागे काही रंगीत चित्रे आहेत. पुरातत्त्व विषयाचे तज्ज्ञ के.के. राजदान यांनी ही मूळ कलाकृती असल्याचे सांगितले. येथील सर्व भितींवरील प्लॅस्टर निघत आहे. भिंत सिमेंटची नाही. त्यामुळे सिमेंट आणून कालवले आणि प्लास्टर केले असे होत नाही. ज्या वस्तूपासून भिंत बांधली आहे, अशाच वस्तू आम्ही वापरतो. उदा. गूळ, चुनखडी, चुना, कापड आदी. यात वेळही जातो आणि पैसाही. त्यामुळे लाल दगडापासून बनवलेला दिवान-ए-आम आहे. येथे बादशहा सामान्य लोकांना भेटत असे. दिवान-ए७खासच्या छताला मोठे तडे गेले आहेत. पुरातत्त्व विभाग गेल्या चार वर्षांपासून छत मूळ स्थितीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. किल्ल्याचे प्रभारी पीयूष भट्ट म्हणाले, हे काम खूप कठीण होते, त्यामुळे एवढा अवधी लागला. १९११ मध्ये ब्रिटनच्या राजाने इथे दरबार भरवला होता.

१० वर्षांची योजना
आम्ही लाल किल्ला मूळ स्वरूपात आणणार आहोत. सरकारने त्यासाठी १० वर्षांची योजना आखली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर इथे चहुबाजूंनी नहर, कारंजी आणि बागा दिसतील.
पीयूष भट्ट, लाल किल्ल्याचे पुरातत्त्व अधिकारी

पैसा नसल्याने यंदा काही होणार नाही
आमच्याकडे पैसा नाही, काय करणार? वार्षिक बजेट ५ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीचे कामच दहा कोटींचे होते. या वर्षी आम्ही काहीच काम करण्याच्या स्थितीत नाहीत.
के. के. राजदान, मुख्य पुरातत्त्व अधिकारी