आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अच्छे दिन येतीलच; अजून थोडा धीर धरा! पंतप्रधान मोदींचा ब्लॉगवर विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान झाल्यानंतर माध्यमांशी फटकून वागणारे नरेंद्र मोदी यांनी पुन्हा प्रसार माध्यमांना फाटा देत महिन्याभराचा लेखाजोखा ब्लॉगमधून मांडला. ते म्हणतात, नव्या सरकारचे वय केवळ एक महिन्याचे आहे, थोडा धीर धरा; अच्छे दिन आने वाले है! पंतप्रधान मोदी यांना 1975 च्या आणीबाणीची आठवण झाली आहे. लोकशाहीचा खरा अर्थही त्यांना आणीबाणीच्या काळातच गवसला. आता सक्रिय लोकशाहीची नांदी ही त्यांचेच सरकार ठरणार असल्याचा त्यांना आत्मविश्वास आहे.

माध्यमांऐवजी ब्लॉग : निवडणुकीच्या आधी प्रसार माध्यमांशी भरभरून बोलणार्‍या महिनाभराचा आढावा सादर करण्यासाठीही त्यांनी ब्लॉगचाच आधार घेतला. मंत्र्यांना खासगी सचिव नेमतानाही नियम व अटी लादल्यामुळे या काळात अनेक मंत्र्यांकडे खासगी मनुष्यबळ येऊ शकले नाही. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नेमलेला खासगी सचिव मोदी धोरणामुळे परत पाठवावा लागला.

मोदी म्हणतात, 26 जून हा आकांक्षा पूर्तीकडे जाण्याचा पहिला महिना आज संपला. 1975 च्या आणीबाणीचा मी साक्षीदार आहे. त्यामुळेच मी जिवंत लोकशाहीचे महत्त्व शिकलो. आणीबाणीचा काळ आपल्या इतिहासातील काळा डाग आहे. त्यामुळे विचाराचे स्वातंत्र्य, माध्यमांची बंधने, विरोधकांना ब्र काढायचा नाही असे आदेश; या बाबी लोकशाहीच्या दृष्टीने कधीच योग्य ठरू शकत नाही. आज या दिवशी नैतिक मूल्ये जपण्याकरिता उत्तम प्रशासन देऊ. जेणेकरून असे वाईट दिवस पुन्हा येणार नाहीत. देशाला मी यशोशिखरावर नेऊ इच्छितो आणि ते मी करणारच.

एकाच महिन्यात काय?
कॉँग्रेस आणि अन्य पक्षांच्या 67 वर्षाच्या सरकारच्या तुलनेत आम्हाला सत्तेत येऊन अवघा एकच महिना झाला असल्याचे मोदी म्हणाले. मंत्र्यांना तोंडावर बोट ठेवायच्या सूचना देणारे, मंत्र्यांना खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी नेमताना वारंवार सूचना करणारे मोदी, रेल्वे, गॅस, साखर, तेलाची महागाई होत असताना भाष्य टाळणारे हे नेतृत्व या देशाने महिनाभरात अनुभवले आहे.

... आणि भाष्य केले!
‘माझ्यासाठी 26 जून ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. आम्ही शासनकर्ते झाल्यानंतर नवखे असल्याची टीका विरोधकांनी केली. दोन-तीन वर्षे आम्हाला काहीच समजणार नाही, अशी आवई उठवली. परंतु, मला केवळ महिनाभरातच प्रशासनावर पकड निर्माण करता आली. माझा आत्मविश्वास आणि निर्धार वाढला. याचे श्रेय माझ्या संपूर्ण चमूला आणि अनुभवाला आहे.
चार वेळा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी राहण्याचा अनुभव माझ्या गाठी असल्याने चांगले निर्णय घेता आले. हे अनुभवाअंतीचे शहाणपण आहे.’

सहकार्य बळ देणारे...
०महिन्याभरात देशवासीयांचे प्रेम व प्रशासनातील अधिकार्‍यांचे सहकार्य बळ देणारे ठरले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटी झाल्या. त्यांच्याशी भविष्यात जवळीकतेने काम करण्याची संधी मिळेल, याबद्दल मी आशावादी आहे, असे मोदींनी म्हटले आहे.
०मोदी म्हणतात, देशात सकारात्मक बदल होतील यावर विश्वास आहे. सुयोग्य गोष्टी, योग्य वेळी सुयोग्य व्यक्तींकडेच संप्रेषित होतील. त्यानंतरच बदल दिसून येईल. विरोधक 100 दिवस सोडा, आताच आरोप करू लागले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, दुष्काळाची धास्ती