आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reduction Of Tax Rates Possible Due To Digital Payment , Finance Minister Arun Jaitly Signal

नाेटबंदी, डिजिटल पेमेंटमुळे करांच्या दरात कपात शक्य, अर्थमंत्री अरूण जेटलींचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार करांच्या दरात कपात करू शकते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वत:च हे संकेत दिले. जेटली म्हणाले, नोटबंदीमुळे काळा पैसा व्यवस्थेत आल्यावर कर महसूल वाढेल. शिवाय डिजिटल देवाण-घेवाणही वाढेल. जास्तीत जास्त व्यवहार करकक्षेत आल्याने कर महसूल वाढेल. त्यामुळे सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही करांच्या दरात कपात करू शकते. प्राप्तिकर व कॉर्पोरेट कर प्रत्यक्ष कर आहे. सेवा कर, उत्पादन शुल्क, व्हॅट इत्यादी अप्रत्यक्ष कर आहेत.

जेटलींनी काळा पैसा जमा करणाऱ्यांनाही इशारा दिला आहे. ते म्हणाले की, तपास संस्थांची नजर नगदी जमा करणाऱ्यांवरही आहे. बँकांत जमा झालेल्या रोख रकमेचा हिशेब केला जाईल. ज्या रकमेवर कर दिला नाही, त्यावर आकारला जाईल.

आरबीआय करणार नव्या नोटांचे ट्रॅकिंग
मोठ्या प्रमाणात काळा पैसा बदलला जात असल्याने आरबीआयने कठोर भूमिका घेतली आहे. सर्व बँकांना करन्सी चेस्टहून निघालेल्या नोटांचे ट्रॅकिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. बँका आता जारी नोटांचा तपशीलही ठेवतील. बँकांना ८ ते ३० नोव्हेंबर दरम्यानचे शाखा व करन्सी चेस्टचे सीसीटीव्ही फुटेजही जपून ठेवावे लागेल.

१० डिसेंबरपर्यंत बँकात आले १२.४४ लाख कोटी रुपये :
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधींनी सांगितले की, १० डिसेंबरपर्यंत बँकात १२.४४ लाख कोटींच्या जुन्या नोटा आल्या आहेत. ४.६१ लाख कोटी नव्या नोटा जारी केल्या आहेत. लोकांनी नोटा घरात साठवून न ठेवता मोकळेपणाने खर्च करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईतही ३३ लाखांच्या नव्या नोटा जप्त :
नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोन हजार रुपयांच्या नोटांत एकूण ३३ लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, नवी मुंबईत २३.७० लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करून दोघांना तर उल्हासनगरमध्ये ९. ७६ लाखांच्या नव्या नोटा जप्त करून तिघांना अटक केली आहे. या सर्व दोन हजारांच्या नोटा आहेत. अटक केलेले पाचही आरोपी नोटांच्या स्रोताबद्दल कोणतेही उत्तर देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीड कोटी काळ्याचे पांढरे; आरबीआय अधिकारी अटकेत
दीड कोटी रुपयांचा काळा पैसा बदलल्याच्या आरोपाखाली आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ विशेष सहायक के. मायकल याला अटक केली. आरबीआयने त्याला निलंबित केले. त्याने १.५१ कोटींच्या जुन्या नोटा बदलून १०० च्या नोटा देण्यास मदत केल्याचा आरोप अाहे.
७ दलाल अटकेत, ९३ लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त
कर्नाटकात नोटा बदलण्याच्या रॅकेटचा सक्तवसुली संचालनालयाने पर्दाफाश करून सात दलालांना अटक केली. त्यांच्याकडून ९३ लाख रुपयांच्या नव्या नोटाही जप्त केल्या. जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्यासाठी दलाल १५ ते ३५ टक्के कमिशन घेत असत.

पुढच्‍या स्‍लाइडवर वाचा, नाेटबंदीच्या मुद्द्यावरून माजी व अाजी अर्थमंत्र्यांत जुगलबंदी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...