आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटर सेवेवर नाेंदवा दूरसंचारच्या तक्रारी, मंगळवारपासून सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दूरसंचार आणि टपाल सेवेच्या ग्राहकांना आता ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे थेट केंद्र सरकारकडे तक्रार करता येईल. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी मंगळवारी ट्विटर सेवा सुरू केली. ट्विटर सेवेद्वारे केलेल्या तक्रारी थेट दूरसंचार मंत्रालयातील अधिकाऱ्यांना मिळतील. त्यांची तातडीच्या, मध्य कालीन आणि दीर्घकालीन अशी वर्गवारी हाेईल. यामुळे दूरसंचार खाते ग्राहकांच्या तक्रारींना रिअल टाइम प्रतिसाद देऊ शकेल. ट्विटरवर #DoTSewa, #BSNLSewa, #MTNLSewa, #PostalSewa या चार कमांडवर ग्राहकांना तक्रारी नोंदवता येतील.
बातम्या आणखी आहेत...