आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Registration Of Marriage Compulsory Within 60 Days News In Divya Marathi

विवाह नोंदणी 60 दिवसांत बंधनकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विवाहाच्या बंधनामध्ये अडकलेल्या प्रत्येक दांपत्याला यापुढे 60 दिवसांमध्ये विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. तसा आदेशच दिल्ली सरकार जारी करणार असून नोंदणी न केल्यास 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

कोणत्याही धर्मामध्ये विवाह करणार्‍या जोडप्याला 60 दिवसांमध्ये नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. नोंदणी न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे, असे दिल्लीचे महसूल सचिव धरमपाल यांनी सांगितले. विवाहाची नोंदणी करण्यासाठी व पारदर्शकतेसाठी सचिव विभाग लवकरच एक पोर्टल तयार करणार आहे. यामुळे विवाहाची नोंदणी सोपी व सोयीस्कर होईल. शिवाय विवाह नोंदणीसाठी ‘तत्काळ’ सुविधाही सुरू करण्यात येणार असून त्यासाठी दहा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.