आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटाच्या सुरक्षेसाठी असेल नियामक व्यवस्था : केंद्र सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  डेटाच्या सुरक्षेसाठी नियामक व्यवस्था लवकरच सुरू होईल, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. न्यायमूर्ती दीपक मिश्रांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींसमोर अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले की, लोकांच्या आवडीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची गरज आहे. व्हॉट्सअॅपच्या खासगीपणाच्या धोरणावर खंडपीठ सुनावणी करत आहे. खंडपीठाने या प्रकरणी सरकारची बाजू ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती.
 
कर्मण्या सिंह सरीन आणि श्रेया सेठी यांच्या याचिकेवर बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे म्हणाले की, सोशल नेटवर्कच्या नव्या गोपनीयता धोरणामुळे वापरकर्त्याचे मेसेज, व्हिडिओ आणि छायाचित्रे तिसऱ्या व्यक्तीला लीक होण्याचा धोका आहे. दुसरीकडे, व्हॉट्सअॅपचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, कंपनी वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे रक्षण करत आहे. नेटवर्कमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर होतो, त्यामुळे कोणतीही तिसरी व्यक्ती वापरकर्त्याचे मेसेज पाहू शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...