नवी दिल्ली - हैदराबादमधील प्रसिद्ध आणि मुस्लिमांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जामिया-निजामिया या मुस्लिम संघटनेने 'भारत माता की जय' म्हणण्या विरोधात फतवा काढला आहे. या संघटनेचे मत आहे, की इस्लाम मुस्लिमांना भारत माता की जय म्हणण्याची परवानगी देत नाही. संघटनेने मौलवी सय्यद गुलाम समादानी अली कादरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे म्हटले आहे. गुलाम समादानी यांनी देशात सुरु असलेल्या वादावर संघटनेचे मत मागितले होते.
माणसाला जन्म जमीनीचा तुकडा देत नाही
- दारुल उलूम इफ्ता आणि इस्लामिक फतवा सेंटरचे मुफ्ती अजीमुद्दीन म्हणाले, 'निसर्ग नियमाप्रमाणे एक व्यक्तीच दुसऱ्या व्यक्तीला जन्म देऊ शकते. लँड ऑफ इंडियाला, भारताला माता म्हणणे योग्य नाही. एका माणुष्याची आई एक जिवंत व्यक्तीच असू शकते, एखादा जमीनीचा तुकडा आई होऊ शकत नाही.'
- फतव्याचा उल्लेख करुन मुफ्ती म्हणाले, 'इस्लाम धर्म नियमानूसार आम्ही भारताच्या धरतीला आई म्हणू शकत नाही. इस्लाम त्याची परवानगी देत नाही. कोणी तसे म्हणत असेल तर ती त्याची वैयक्तिक बाब आहे.'
- त्यासोबतच मुफ्ती म्हणाले, 'मात्र ती व्यक्ती दुसऱ्यांनाही तसे म्हणण्यासाठी बळजबरी करु शकत नाही.'
देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी 'जय' म्हणणे एकमात्र उपाय नाही
- इस्लाममध्ये 'भारत माता की जय' म्हणण्याला परवानगी नसल्याच्या वक्तव्याला दुसऱ्या मौलवींनीही दुजोरा दिला आहे.
- हैदराबादच्या सूरत-उन-नबी अकादमीने म्हटले आहे, की भारतीय संविधानतही कुठेही लिहिलेले नाही की देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी 'भारत माता की जय' म्हणा.
पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले होते ओवेसी....त्यावरुन उडाले वादळ....