आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती बिझनेसमन, MBA पत्नी लढवते निवडणूक, अद्याप पाहिला नाही पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या निवडणूक रणांगणामध्ये सगळ्याच पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने एकिकडे किरण बेदींना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारी घोषित केले आहे, तर आणखी पाच महिलांनाही उमेदवारी दिली आहे. 62 उमेदवारांपैकी किरण बेदींसह केवळ सहा महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एक आहेत, शालीमार बागच्या उमेदवार रेखा गुप्ता.

रेखा गुप्ता लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य राहिल्या आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द 1992 मध्ये दौलत राम कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून सुरू झाली. महाविद्यालयीन काळात त्या अभाविपशी संलग्न झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्या लढू लागल्या.
रेखा गुप्ता यांची विजयी मोहीम
>1994-95 दरम्यान दौलत राम कॉलेजच्या सेक्रेटरी
>1996-97 पर्यंत दिल्ली विद्यापीठाच्या अध्यक्षा
>2012 मध्ये रेखा गुप्ता यांनी महापालिका निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाल्या.

त्यानंतर बराच काळ भाजपमध्ये काम केल्यानंतर त्यांना आता यावेळी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. रेखा यांचा जन्म हरियणामध्ये झाला होता. आरएसएसमध्ये सक्रिय असलेल्या जयभगवान जिंदाल यांच्या त्या कन्या आहेत. रेखा यांचे एम.ए. पर्यंतचे शिक्षण दिल्लीतून झाले आहे. त्यांनी AIIMA महाविद्यालयातून एमबीएही केले आहे. रेखा यांचा विवाह दिल्लीचे एक उद्योगपती मनीष गुप्ता यांच्याशी झाला. मनीष लाला शंभूरामजी सिंगल यांचे नातू आहेत. ते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रेखा गुप्ता यांचे PHOTO