आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा, सचिनची बजेटच्या पहिल्या टप्प्यात दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपल्या क्षेत्रात नामांकित असलेले अभिनेत्री रेखा आणि क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर या दोघांनी अर्थसंकल्पात एक दिवसही हजेरी लावली नाही. खासदार रेखा आणि सचिन यांचे या काळात एकदाही दर्शन झाले नाही. राज्यसभेकडून रेखाला रजा मंजूर झाली आहे. 21 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात ती हजर राहू शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. तालिका सभापती ई एम एस नचीयप्पन यांनी सदस्यांना ही माहिती दिली. सचिन तेंडुलकरनेही 21 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात रजा घेतली होती. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत गुंतल्यामुळे हजर राहू शकत नसल्याचे सचिनकडून सांगण्यात आले होते. शनिवारपासून अधिवेशनाचा कालावधी चार तासांनी कमी होणार आहे.