आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relationship Between Narendra Modi And Female Architects

मोदींचे आर्किटेक्ट महिलेसोबत अनैतिक संबंध- आयएएस अधिका-याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुजरातचे निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप एन शर्मा यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि बंगळुरुमधील संबंधित आर्किटेक्ट महिला यांच्यात अनैतिक संबंध आहेत. प्रदीप शर्मा यांनी काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत या बाबीचा उल्लेख केला होता. मात्र, त्यावेळी कोर्टाने त्यांना खासगी व वैयक्तिक स्वरूपाचे आरोप काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. याआधी गुजरात सरकारने शर्मा यांच्यावर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप केले होते.
आता शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या नव्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मोदी यांच्या म्हणण्यानुसारच गुजरात प्रशासनाने आपल्याविरोधात मोर्चा उघडला आहे. माझ्यावर चार-चार एफआयआर दाखल केले गेले आहेत. नरेंद्र मोदी आणि संबंधित महिला ऑर्किटेक्ट यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती व पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळेच मला अडकवले गेले आहे. मोदी यांना भीती आहे की, संबंधित महिला आर्किटेक्टसोबतची आक्षेपार्ह अवस्थेतील सीडी माझ्याकडे आहे. त्यामुळेच मला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे शर्मा यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
पुढे वाचा, कोण आहे ती महिला ऑर्किटेक्ट आणि कसा आला मोदींशी तिचा संबंध....