आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2050 पर्यंत देशात 30 कोटींहून अधिक मुस्लिम, जगातील तिसरी सर्वात मोठी संख्या हिंदूची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत२०५० पर्यंत इंडोनेशियाला मागे टाकून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश होईल. तर जगातील तिसरी सर्वात मोठी लोकसंख्या हिंदूची असेल. प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकी संस्थेने गुरुवारी एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात हा दावा करण्यात आला. 
 
अहवालानुसार, या शतकाच्या अखेरीस जगात सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिमांची असेल. या काळात ७३ % मुस्लिम तर ३५% ख्रिश्चन आणि ३४ % हिंदू वाढतील. जगात २०५० पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या एकूण लाेकसंख्येच्या ३०% असेल. 
 
भारतात ख्रिश्चनांपेक्षा 4 पट मुस्लिम 
२०५०पर्यंत भारतात मुस्लिमांची लोकसंख्या ख्रिश्चनांच्या तुलनेत 4 पटीने वाढेल. तर हिंदू ३३% आणि ख्रिश्चन १८% वाढतील. 
 
हिंदू-ख्रिश्चनांपेक्षा दुप्पट मुस्लिम
प्यूच्या अहवालात २०१० ते २०५० दरम्यान वेगवेगळ्या धर्मांची लोकसंख्येचा अंदाज व्यक्त केला. यानुसार जगात मुस्लिमांची लोकसंख्या इतर धर्मियांच्या तुलनेत दुप्पट असेल. आता जगात सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चनांची, मुस्लिम दुसऱ्या तर नास्तिक तिसऱ्या स्थानावर 
 
२०७० पर्यंत इस्लाम धर्मिय सर्वाधिक 
अहवालानुसार दुसऱ्या धर्माच्या तुलनेत इस्लाम धर्मीयांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढेल. यामुळे २०७० पर्यंत इस्लाम देशातील सर्वाधिक अनुयायांचा धर्म असेल. अहवालानुसार २०५० पर्यंत यूरोपात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढून १० % होईल. सात वर्षापूर्वी म्हणजे २०१० मध्ये युरोपात ५.९ % मुस्लिम होते.  

मुस्लिम का वाढतात? 
{ मुसलमानांचा लोकसंख्या वाढीचा दर इतर सर्व धर्माहून जास्त आहे. सर्वात जास्त प्रजजन दर असल्याने मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढू शकते. जागतिक स्तरावर एक मुस्लिम महिला सरासरी ३.१ मुले होतात. तर इतर धर्मीयात हे प्रमाण सरासरी २. इतके आहे. 
{ मुस्लिम लोकसंख्येत तरुणांचा भरणा सर्वात जास्त आहे. २०१० मध्ये मुस्लिम तरुणांचे सरासरी वय २३ वर्षे इतके होते. तर गैर -मुस्लिम तरुणांचे वय सरासरी ३० वर्षे इतके होते. 
 
बौद्धांत घट 
अहवालात बौद्धांची संख्या घटेल असे सांगण्यात येते. बौद्धांची लोकसंख्या २०५० पर्यंत उणे ०.३ % पर्यंत घटण्याची शक्यता आहे. चीन, जपान आणि थायलंडसारख्या देशात बौद्ध धर्मिंयांची संख्या जास्त आहे. परंतु ही लोकसंख्या सातत्याने वृद्ध होत चालली आहे, यामुळे याचा जननदर कमी आहे. 

- अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने जारी केला विविध धर्मिंयांचा अहवाल 
पुढील स्‍लाइडवर पाहा, धर्म आणि ग्रोथ अनुमानाचा तक्‍ता... 
बातम्या आणखी आहेत...