आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सचा ५ वर्षांनंतर नफ्याचा विचार! जिओने दिलेल्या ‘फ्री’ प्लॅनवर इतर कंपन्यांचा आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबानी. - Divya Marathi
मुकेश अंबानी.
नई दिल्ली- रिलायन्स जिओ आल्यानंतर दूरसंचार उद्योगात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे इतर कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम तर होणारच असून रिलायन्सलादेखील जास्त महसूल मिळणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पाच वर्षांनंतर नफा मिळण्याचा विचार रिलायन्स करत असल्याचे वाटते, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तोपर्यंत रिलायन्स ग्राहकांची संख्या वाढविण्यावर भर देणार आहे. जिओच्या विरोधी कंपन्यांनी “फ्री’ प्लॅनवर आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रिलायन्स जिओ माेफत व्हॉइस कॉलचा दावा करत असली तरी हा दावा खोटा असल्याचा आरोप सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनचे (सीओएआय) महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी केला आहे. या दरात डाटा तसेच व्हॉइस कॉल या दोघांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात सेवेचा दर्जा कायम राखण्याचे आव्हान जिओसमोर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात रिलायन्सला फायदा होणार असला तरी तो किती काळ टिकेल याबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर कंपनीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वस्तच्या नावाखाली सेवेच्या दर्जाबाबत ग्राहक दुर्लक्ष करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिओच्या या प्लॅनमुळे इतर कंपन्यांची स्पर्धा कमी होणार नाही. दररोज १९ रुपयांचा प्लॅन सोडला, तर इतर सर्व प्लॅन मध्यम तसेच उच्च अाहेत. अशा प्रकारचे इतर अनेक कंपन्यांचे प्लॅन सध्या असल्याचेही ते म्हणाले. सध्या प्रति युजर मासिक सरासरी महसूल १८० रुपये आहे. रिलायन्स ४०० ते ४९९ रुपयांच्या रेंजमध्ये स्वत:ला ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मॅथ्यूज यांनी सांगितले.

जिओची ही घोषणा दूरसंचार उद्योगासाठी गेमचेंजर सिद्ध होणार असल्याचे मत मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजचे संशोधन विभागप्रमुख धर्मेश कांत यांनी व्यक्त केले आहे. मात्र, यामुळे कंपन्यांच्या महसुलावरही परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. दर कमी झाल्यामुळे कंपन्यांचे उत्पन्न कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, यानंतर काय घडल्या आन् काय घडू शकतील घडामोढी...
- इतर कंपन्यांच्या मोबाइलवर काॅल्स करण्यासाठी येत आहेत अडचणी
- काय म्हणतात तज्ज्ञ आर. जगन्नाथन
- मोबाइलटॉवर एवजी काय वापरणार रिलायन्स....
बातम्या आणखी आहेत...